बीड : आष्टी-पाटोदा-शिरूर मतदारसंघातील गोरगरीब व सर्वसामान्य जनतेसाठी सातत्याने धावून जाणारे आणि आरोग्यदूत म्हणून ओळखले जाणारे आमदार सुरेश (आण्णा)

बीड : आष्टी-पाटोदा-शिरूर मतदारसंघातील गोरगरीब व सर्वसामान्य जनतेसाठी सातत्याने धावून जाणारे आणि आरोग्यदूत म्हणून ओळखले जाणारे आमदार सुरेश (आण्णा) धस यांच्या पुढाकारातून शिरूर तालुक्यातील उंबरमुळी येथील श्रीमती आशाबाई जगन्नाथ शिंदे यांना मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून 60 हजार रुपयांची आर्थिक मदत मिळाली आहे. यामुळे शिंदे कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला आहे.
श्रीमती आशाबाई शिंदे या सध्या छत्रपती संभाजीनगर येथील मेडिकोव्हर हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. त्यांच्या हिप (खुबा) प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी मोठा खर्च अपेक्षित असल्याने कुटुंबाने आमदार सुरेश धस यांच्याशी संपर्क साधला होता. त्यानंतर आमदार धस यांनी तातडीने आरोग्य विभागाशी संबंधित अधिकारी विकास तात्या साळवे, दत्ता हुले, विनोद वाघ यांना आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. सर्व कागदपत्रांची पूर्तता करून मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून मदत मंजूर करण्यात आली. ही रक्कम संबंधित रुग्णालयाच्या खात्यावर जमा करण्यात आली असून, शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली आहे. सध्या आशाबाई शिंदे यांची प्रकृती सुधारत आहे. या मदतीमुळे शिंदे कुटुंबाने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महायुती सरकार तसेच आमदार सुरेश धस यांचे आभार मानले आहेत.

COMMENTS