Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भोंदूबाबा अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचा समृद्धीवर भीषण अपघातात मृत्यू!

आज अशोक खरातचे निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन झालं आहे. नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात याची सध्या एसआयटीकडून कसून चौकशी सुरु असताना स

पालघरमध्ये दारू पिऊन वाहन चालवणाऱ्या ट्रक चालकाची मुजोरी; अपघात करून पळणाऱ्या चालकाला धडा शिकवला
कंटेनरची तीन घरांना धडक; माणिकदौण्डी परिसरातील घटना ; जीवितहानी नाही
भीषण अपघात : समृद्धी महामार्गावर कारला जोरदार धडक, दीड वर्षाचा चिमुकला सुखरूप!
जितेंद्र शेळकेंच्या लॉन्समध्येही अशोक खरातची भागिदारी होती.

आज अशोक खरातचे निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन झालं आहे. नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात याची सध्या एसआयटीकडून कसून चौकशी सुरु असताना समृद्धी महामार्गावर जितेंद्र शेळकेंच्या कारचा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये जितेंद्र शेळके यांचा जागीच मृत्यू झाला. सदर या अपघातामध्ये जितेंद्र शेळके आणि त्यांची पत्नी अनुराधा जितेंद्र शेळकेंचा देखील या अपघातत मृत्यू झाला आहे. तर मुलगा गंभीर जखमी आहे. छत्रपती संभाजीनगरहून शिर्डीकडे येताना धोत्रे गावाजवळ जितेंद्र शेळकेंच्या कारचा अपघात झाला. जितेंद्र शेळके यांची कारने थेट उभ्या असणाऱ्या कंटेनरला पाठीमागून धडक दिली. यावेळी कार थेट कंटेनरखाली घुसली. जितेंद्र शेळके अशोक खरातच्या शिवनिका ट्रस्टचे उपाध्यक्ष राहिले आहेत. जितेंद्र शेळकेंच्या लॉन्समध्येही अशोक खरातची भागिदारी होती. अशोक खरातला अटक झाल्यापासून जितेंद्र शेळके तणावात होते. अशोक खरातचे निकटवर्तीय म्हणून ओळख असणाऱ्या जितेंद्र शेळकेंचा मृत्यू झाल्याने विविध प्रश्न आता उपस्थित होत आहेत.
जितेंद्र शेळके यांचा अपघाती मृत्यू झाल्याने संशय निर्माण होत आहे. जितेंद्र शेळकेंच्या भीषण अपघात प्रकरणावर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी प्रतिक्रिया दिली.
अशोक खरात ची चौकशी सुरु असतानाच शेळके यांचा अपघाती मृत्यू कसा झाला? शेळके यांचा अपघात की घातपात? अशा मोठा संशय राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी
 केला आहे. दरम्यान, रोहित पवार यांनीही ट्विट करुन शंका उपस्थित केली आहे. यामध्ये कुणीतरी अडचणीत येऊ नये, म्हणून तर हा अपघात घडवून आणला नाही ना, अशी शंका रोहित पवार यांनी केली आहे.

COMMENTS