Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विलास शिंदे व निलिमा साठे यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार

मुंबई ः महाराष्ट्र राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागार्तंगत देण्यात येणारा राज्यस्तरीय डा.बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पूरस्कार न

आरक्षण हा आपल्या जिव्हाळ्याचा प्रश्‍न : शशिकांत तरंगे
जिल्हा परिषदेकडील कृषि योजनांसाठी 1083 लाभार्थ्यांची निवड
किरीट सोमय्यांना शहरात कायमची प्रवेशबंदी… नगरपालिकेने केला ठराव

मुंबई ः महाराष्ट्र राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागार्तंगत देण्यात येणारा राज्यस्तरीय डा.बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पूरस्कार नाशिक येथील सामाजिक कार्यकर्ते विलास शिंदे आणि त्यांच्या सुविद्य पत्नी निलिमा साठे-शिंदे यांना 12 मार्च 2024 रोजी जमशेटजी भाभा नाट्यगृह नरीमन पोंईट मुंबई येथे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या शुभहस्ते व उपमूख्यमंत्री अजितदादा पवार, क्रीडा व  युवक कल्याणमंत्री संजय बनसोडे, आमदार भरतशेट गोगावले व सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सचिव सुमंत भांगे यांच्या प्रमूख उपस्थितीत सामाजिक कार्यात मौलीक कार्य केल्याबद्दल प्रदान करण्यात आला.
विलास शिंदे लोकभारती समाज सेवा संस्थेच्या माध्यमातून साडे चारसे बचतगटाच्या माध्यमातून पाच हजार महिला व शेतकर्‍यांचे संघटन करून त्यांना स्वावलंबी करण्याचा प्रयत्न केला आहे. आदिवाशी लोकांना त्यांचे वनजमिनी मिळण्याकामी त्यांचे प्रबोधन केले आहे. तसेच संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाचे विभागीय परीक्षक होते. दलित आदिवाशी भागातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी ऊत्तर महाराष्ट्रात विविध संस्थाच्या माध्यमातून कार्य केले आहे. या कार्याची शासनाने दखल घेऊन त्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पूरस्कार देवून सन्मान केला आहे. याबद्दल सर्व स्तरावर त्यांचे अभिनंदन केले जात आहे.

COMMENTS