किरीट सोमय्यांना शहरात कायमची प्रवेशबंदी… नगरपालिकेने केला ठराव

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

किरीट सोमय्यांना शहरात कायमची प्रवेशबंदी… नगरपालिकेने केला ठराव

प्रतिनिधी : कोल्हापूर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून मुरगूड नगरपालिकेची विशेष सर्वसाधारण सभा पार पडली. यावेळी झालेल्या ठरावात किरीट सोमय्

माथाडी मंडळांच्या भरतीत माथाडी कामगारांच्या मुलांना प्राधान्य देणार : हसन मुश्रीफ
शासकीय रुग्णालयांमध्येही लवकरच प्रत्यारोपण सुविधा
Mumbai : आघाडीत विसंवाद? सोमय्यांवरील कारवाईबाबत मुख्यमंत्री अंधारात? (Video)

प्रतिनिधी : कोल्हापूर

व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून मुरगूड नगरपालिकेची विशेष सर्वसाधारण सभा पार पडली. यावेळी झालेल्या ठरावात किरीट सोमय्यांना शहरात प्रवेश द्यायचा नाही, असा ठराव सर्वसंमतीने मंजूर केला गेला. 

मंगळवारी कोल्हापूर दौऱ्यावर असलेले किरीट सोमय्या मुश्रीफांविरोधात तक्रार देण्यासाठी मुरगुड पोलीस ठाण्यात जाण्याच्या तयारीत आहेत. सोमय्यांचा नियोजित दौर्‍याच्या पार्श्वभूमीवर नगरपालिकेने ठराव मंजूर केला आहे.

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hassan Mushrif) यांच्यावर घोटाळ्याचा आरोप करणारे भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी पुन्हा एकदा कोल्हापूरला जाण्याचा निर्णय घेतला आहे. 

मात्र त्यांच्या हा दौरा गाजण्याची शक्यता आहे. कारण मुरगूड नगरपालिकेने मुरगूड शहरात सोमय्या यांना कायमच्या प्रवेश बंदीचा ठराव सर्वसाधारण सभेत मंजूर केला आहे.

किरीट सोमय्यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर गडहिंग्लज साखर कारखान्यात 127 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे. 

किरीट सोमय्या हे पुढील आठवड्यात मंगळवारी (२८ सप्टेंबर ) किंवा बुधवारी ( २९ सप्टेंबर ) कोल्हापुच्या दौऱ्यावर येणार आहेत. याबाबत त्यांनीच मुंबईत माध्यमांना माहिती दिली. 

मी अंबाबाईचे दर्शन घेण्यासाठी कोल्हापूर येथे जाणार आहे. तसे पत्र मी कोल्हापूरचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांना दिले आहे, असे सोमय्या यांनी सांगितले. त्यामुळे सोमय्या कोल्हापुरात आल्यास पुन्हा एकदा संघर्षाची ठिणगी पडण्याची चिन्हे आहेत.

COMMENTS