Homeताज्या बातम्यादेश

राज्यसभेच्या 56 जागांसाठी निवडणूक

27 फेबु्रवारीला मतदान ; महाराष्ट्रातील 6 जागांचा समावेश

नवी दिल्ली ः लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजण्याआधीच राज्यसभेच्या 56 जागांसाठी निवडणुकीची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाने केली आहे. या 56 जागांमध्ये म

दिवंगत आमदार भिकचंदजी दोंदे फाऊंडेशन ने अखेर दिला आदिवासी बांधवाना न्याय
सुशीलकुमारांची राजकीय कंडी !
नगर-कल्याण रोडवर भव्य फटाका मार्केट सुरु

नवी दिल्ली ः लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजण्याआधीच राज्यसभेच्या 56 जागांसाठी निवडणुकीची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाने केली आहे. या 56 जागांमध्ये महाराष्ट्रातील 6 जागांचा समावेश आहे. सध्या या 6 पैकी 3 जागा सत्ताधारी भाजपच्या ताब्यात असून, विरोधकांच्या मविआतील घटकपक्षांकडेही 3 जागा आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीत या पक्षांना आपापले गड राखता येतील किंवा नाही हे लवकरच स्पष्ट होणार आहे.
निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार 27 फेब्रुवारी रोजी निवडणूक होणार आहे. तर, उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख 15 फेब्रुवारी असणार आहे. 15 राज्यांतील 56 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. त्यानुसार 8 फेब्रुवारी रोजी अधिसूचना जाहीर होणार आहे. 15 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करता येईल. 16 फेब्रुवारीला उमेदवारांच्या अर्जांची छाननी प्रक्रिया होईल. तसेच, 20 फेब्रुवारीपर्यंत उमेदवार आपला अर्ज मागे घऊ शकतील. तर, 27 फेब्रुवारीला सकाळी 9 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडेल. तर, 27 तारखेलाच मतमोजणी होईल. 13 राज्यातील जागांचा कार्यकाळ 2 एप्रिल रोजी संपणार आहे. तर, उर्वरित दोन जागांचा कार्यकाळ 3 एप्रिल रोजी संपणार आहे. आंध्र प्रदेश 3, बिहार 6, छत्तीसगड 1, गुजरात 4, हरयाणा 1, हिमाचल प्रदेश 1, कर्नाटक 4, मध्य प्रदेश 5, महाराष्ट्र 6, तेलंगणा 3, उत्तर प्रदेश 10, उत्तराखड 1, पश्‍चिम बंगाल 5, ओडिसा 2, राजस्थान 3 अशा एकूण 56 जागांसाठी 27 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे.

महाराष्ट्रातील या सहा जागा होणार रिक्त – महाराष्ट्रातील राज्यसभेच्या 6 जागा यंदा रिक्त होणार आहेत. यात सत्ताधारी पक्षाचे तसेच परराष्ट्र राज्यमंत्री व्ही मुरलीधरन, केंद्रीय मंत्री नारायण राणे व माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर या भाजपच्या 3 नेत्यांच्या जागांचा समावेश आहे. याशिवाय काँग्रेसचे कुमार केतकर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वंदना चव्हाण व शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई यांचीही जागा यंदा रिक्त होणार आहे. आता या 6 जागांवर हे नेते पुन्हा निवडून जाणार की पक्ष इतर कोणत्या नेत्याला संधी देणार? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. विशेषतः केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे काय होणार? भाजप त्यांना राज्यसभेवर पाठवणार की लोकसभेच्या मैदानावर उतरवणार? हे पाहणेही या प्रकरणी महत्त्वाचे ठरणार आहे.

COMMENTS