जिल्हा परिषदेकडील कृषि योजनांसाठी 1083 लाभार्थ्यांची निवड

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जिल्हा परिषदेकडील कृषि योजनांसाठी 1083 लाभार्थ्यांची निवड

बुलडाणा/पुरुषोत्तम बोर्डे  डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना व बिरसा मुंडा कृषि क्रांती योजना अनुक्रमे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प

Dhule : करपलेली पिके घेऊन शेतकरी थेट जिल्हाधिकारी कार्यालयात (Video)
राजारामबापू कारखान्याच्या कर्मचार्‍यांना 12 टक्के पगारवाढ : पी आर पाटील
Superfast Maharashtra : पिकांच्या नुकसान भरपाईसाठी 365 कोटी 67 लाख रुपये मंजूर (Video)

बुलडाणा/पुरुषोत्तम बोर्डे 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना व बिरसा मुंडा कृषि क्रांती योजना अनुक्रमे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रवर्गाच्या शेतकऱ्यांसाठी शाश्वत सिंचनाची सुविधा उपलब्ध करून उत्पन्न वाढविण्याकरीता राबविण्यात येतात. या योजनांमध्ये लाभार्थी अनुक्रमे अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील असणे आवश्यक आहे. त्यांच्याकडे किमान 040 हे व कमाल 6 हेक्टर पर्यंत जमीन असणे आवश्यक आहे. लाभार्थ्यांचे वार्षिक उत्पन्न 1,50,000 /- रूपये पेक्षा अधिक नसावे. प्रस्तावित विहीर पुर्वीपासून अस्तित्वात असलेल्या विहीरीपासून 500 फुटपेक्षा जास्त अंतरावर असावी. योजनेतंर्गत नविन विहीर 2 लक्ष 50 हजार रूपये, जुनी विहीर दुरूस्ती 50 हजार रूपये, विद्युत जोडणी 10 हजार, विद्युत पंप संच 20 हजार, सूक्ष्म सिंचन ठिबक 35 टक्के जस्तीत जास्त 50 हजार, तुषार सिंचन संच 35 टक्के जास्तीत जास्त 25 हजार व शेततळे अस्तरीकरण 1 लक्ष रूपये अनुदान देय आहे.

  सदर दोन्ही योजना सन 2020-21 पासून महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन सुरू आहे. लाभार्थ्यांनी mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक असून हे संकेतस्थळ कायमस्वरूपी असणार आहे. या योजनेतंर्गत 2020-21 करीता अर्ज केलेल्या लाभार्थ्यांची ऑनलाईन सोडत झालेली आहे. आतापर्यंत 578 लाभार्थ्यांची अद्यापही आवश्यक कागदपत्रे ऑनलाईन अपलोड केलेली नाहीत. याकरीता निवड झालेल्या पात्र लाभार्थ्यांनी    7/12, नमुना 8 अ, सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले जातीचे प्रमाणपत्र,  चालु आर्थिक वर्षाचा उत्पन्नाचा दाखला, आधार संलग्न बँकेचे पासबुक, आधार कार्ड कागदपत्रे त्वरित ऑनलाईन  अपलोड करण्यात यावी. तरी निवड झालेल्या लाभार्थ्यांनी  आवश्यक असणारी कागदपत्रे 25 ऑक्टोंबर 2021 पर्यंत अपलोड करावीत.

  तसेच सन 2021-22 करीता 2 ऑक्टोंबर रोजी ऑनलाईन सोडत करण्यात आली. यामध्ये निवड झालेल्या 1083 लाभार्थ्यांनीसुद्धा वरील कागदपत्रे 25 ऑक्टोंबर पर्यंत अपलोड करावीत, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या कृषि विकास अधिकारी अनिसा महाबळे यांनी केले आहे.

COMMENTS