Homeताज्या बातम्या

 कर्णधार हरमनप्रीत कौरचा विश्वविक्रमटी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २०० सामने खेळणारी पहिली क्रिकेटपटू

मुंबई : भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर हिने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्

इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघ जाहीरकोहली-बुमराह पुनरागमन, यशस्वी जैस्वालला मात्र वगळले
सौरव गांगुली आणि अंजुम चोप्रा आयसीसी हॉल ऑफ फेममध्ये
आयपीएल 2027 लवकरच सुरू होण्याची शक्यता


मुंबई : भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर हिने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात मैदानात उतरताच तिने २०० टी-२० आंतरराष्ट्रीय सामने पूर्ण केले. अशी कामगिरी करणारी ती जगातील पहिलीच क्रिकेटपटू ठरली असून पुरुष आणि महिला अशा दोन्ही गटांतील कोणत्याही खेळाडूला हा टप्पा यापूर्वी गाठता आलेला नव्हता.
सन २००९ मध्ये इंग्लंडमध्ये झालेल्या महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेतून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलेल्या हरमनप्रीतने गेल्या १७ वर्षांत भारतीय महिला क्रिकेटला नवे स्थान मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. तिच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने अनेक उल्लेखनीय कामगिरी करत जागतिक स्तरावर आपला ठसा उमटविला आहे.
पुरुषांच्या टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामने खेळण्याचा विक्रम पॉल स्टीरलिंग यांच्या नावावर असून त्यांनी १६३ सामने खेळले आहेत. भारतीय कर्णधार रोहित  शर्मा  यांनी १५९, तर विराट  कोहली  यांनी १२५ सामने खेळले आहेत. महिला क्रिकेटमध्ये हरमनप्रीत २०० सामन्यांसह अव्वल स्थानावर आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यापूर्वी भारतीय संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक अविष्कार  साळवी  यांनी हरमनप्रीतच्या कामगिरीचे कौतुक करत तिचे नेतृत्व, शिस्त आणि मेहनत युवा क्रिकेटपटूंसाठी प्रेरणादायी असल्याचे सांगितले.  

COMMENTS