Homeताज्या बातम्या

नांदेडमध्ये 26 जून रोजी राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त भव्य शोभायात्राहत्तीवरील जीवंत देखावा, 20 घोडे, मल्लखांब, लेझीम, ढोल-ताशे आणि मशाल रॅली ठरणार आकर्षण

आरक्षणाचे जनक, लोकराजा छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त नांदेड शहरात 26 जून रोजी भव्य जयंती महोत्सव व शोभायात्रेचे आयोजन करण्यात

मुसळधार पावसाच्या इशार्‍यानंतर मनपा सतर्कआयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी संवेदनशील भागांची केली पाहणी
देगलूरमध्ये खळबळ : नगराध्यक्षा व कुटुंबीयांवर जुगार क्लब चालवण्याचे आरोप; अज्ञात पॅम्पलेट व्हायरल
नांदेडमध्ये रक्तरंजित साखळी; शिवसेना कार्यकर्त्याची हत्या



आरक्षणाचे जनक, लोकराजा छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त नांदेड शहरात 26 जून रोजी भव्य जयंती महोत्सव व शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. फुले-शाहू-आंबेडकर मेमोरियल ट्रस्ट, नांदेड आणि मराठी नाऊ फाऊंडेशन, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने हा भव्य सोहळा पार पडणार असल्याची माहिती ट्रस्टचे संस्थापक तथा अध्यक्ष इंजि. प्रवीण खंदारे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सायंकाळी 4 वाजता महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरातून शोभायात्रेला प्रारंभ होणार असून शिवाजीनगर, आंबेडकरनगर, जनता कॉलनी, गणेशनगर, राजनगर मार्गे छत्रपती राजर्षी शाहू महाराज पुतळा येथे मिरवणुकीचा समारोप होणार आहे. या शोभायात्रेचे मुख्य आकर्षण म्हणजे हत्तीवर साकारण्यात येणारा छत्रपती राजर्षी शाहू महाराजांचा जीवंत देखावा. याशिवाय 20 घोडे, उंट, पारंपरिक बँड, मर्दानी खेळ, 100 मुलींचे लेझीम पथक, मुलींचे ढोल पथक, हलगी पथक, केरळ ड्रम, बंजारा व आदिवासी नृत्य, मल्लखांब प्रात्यक्षिके, कुस्ती तसेच 100 मुलामुलींची मशाल रॅली अशा विविध सांस्कृतिक आणि पारंपरिक कलांचे दर्शन नांदेडकरांना घडणार आहे. राजर्षी शाहू महाराजांच्या सामाजिक समतेच्या आणि शिक्षणविषयक विचारांचा जागर करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या महोत्सवाला राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाठ, नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे तसेच माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. या भव्य शोभायात्रेत नांदेड शहरासह जिल्ह्यातील सर्व समाजबांधव, युवक-युवती, महिला आणि शाहूप्रेमींनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन जयंती उत्सव यशस्वी करावा, असे आवाहन संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे. पत्रकार परिषदेला ट्रस्टचे सचिव डॉ. शुद्धोधन शंकरराव एडके बरबडेकर, संयोजन समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा रुग्णालयाचे माजी वैद्यकीय अधिकारी डॉ. विकास  वाठोरे, उपाध्यक्ष बाळासाहेब लोणे, सचिव इंजि. प्रशांत दवणे, सहसचिव बालाजी पवार, कोषाध्यक्ष महेंद्र देमगुंडे, सदस्य प्रवीणकुमार देशमुख, कुलदीप नंदूरकर, यशपाल भोसले, कुवरचंद मंडले आदी उपस्थित होते. राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांना अभिवादन करण्यासाठी आणि सामाजिक समतेचा संदेश जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या भव्य शोभायात्रेकडे संपूर्ण नांदेड जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

COMMENTS