Homeताज्या बातम्या

धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर आता नितीन गडकरी ‘रडारवर’; E20 पेट्रोलविरोधात युवक काँग्रेसचा नागपुरात जनआक्रोश मोर्चा

नागपूर :NEET पेपरफुटीच्या मुद्द्यावरून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत आक्रमक आंदोलनानंतर, आता युवक काँग्रे

माती परीक्षणातूनच जमिनीचे आरोग्य सुधारेल; डॉ. भीमराव कांबळे यांचे प्रतिपादन, बेलापूर येथे शेतकऱ्यांना कृषी निविष्ठांचे वाटप
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेतील विकास कामे तातडीने सुरू करा; अन्यथा २ जुलैपासून बेमुदत धरणे आंदोलनाचा इशारा
पातळगंगेचे पाणी दूषित; दुर्गंधीने वाढली आरोग्याची चिंता! पाणी स्वच्छ होईपर्यंत स्विमिंग टाळा: डॉ. मुंडे, डॉ. भुमे
E20 पेट्रोलविरोधात युवक काँग्रेसचं गडकरींच्या घरासमोर आंदोलन! शेकडो  कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात! | Times Now Marathi

नागपूर :NEET पेपरफुटीच्या मुद्द्यावरून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत आक्रमक आंदोलनानंतर, आता युवक काँग्रेसने आपला मोर्चा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे वळवला आहे. देशात लागू करण्यात आलेल्या E20 (२० टक्के इथेनॉल मिश्रित) पेट्रोलला विरोध दर्शवत युवक काँग्रेसच्या वतीने नागपुरात नितीन गडकरी यांच्या निवासस्थानावर ‘जनआक्रोश घेराव’ आंदोलनाची हाक देण्यात आली.

सोमवारी दुपारी १ वाजता नागपूरच्या चिटणीस पार्क चौकातून या मोर्चाला सुरुवात झाली. शेकडो कार्यकर्त्यांनी हातात पोस्टर्स आणि फलक घेऊन नितीन गडकरी व केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. आंदोलकांचा रोख थेट गडकरींच्या खाजगी निवासस्थानाकडे होता. मात्र, सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी गडकरींच्या घराजवळ मोठा बंदोबस्त आणि बॅरिकेट्स तैनात केले होते.

युवक काँग्रेसचे कार्यकर्ते बॅरिकेट्सवर चढून पुढे जाण्याचा प्रयत्न करत असताना पोलीस आणि आंदोलकांमध्ये मोठी झटापट झाली. पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांची धरपकड केली आणि त्यांना रोखले.

‘इथेनॉल मिश्रित इंधनामुळे गाड्यांचे नुकसान’

आंदोलनकर्त्यांच्या मते, “इथेनॉल मिश्रित इंधनामुळे देशातील हजारो वाहनधारकांचे मोठे नुकसान होत आहे. जुन्या व नव्या गाड्यांचे इंजिन खराब होणे, मायलेज कमी होणे आणि मेन्टेनन्सचा खर्च वाढणे अशा गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत. नितीन गडकरी यांनी इथेनॉल धोरणाचा अट्टहास धरून सामान्य जनतेच्या खिशावर दरोडा टाकला आहे.” या धोरणाचा निषेध नोंदवत युवक काँग्रेसने गडकरी यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

COMMENTS