Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

लोकसभेच्या जागा वाटपासाठी दिल्लीत पुन्हा बैठक

मुंबई प्रतिनिधी - महाराष्ट्रातील लोकसभेच्या ४८ जागांबाबत महायुतीमध्ये अद्याप तोडगा निघालेला नाही. मुंबईतील बैठकीत निर्णय न झाल्यानं अमित शाह

वडिलांप्रमाणेच सरन्यायाधीश बनणारे न्या. चंद्रचूड दुसरे!
तुम्ही हाक द्या आम्ही साथ देण्यासाठी सज्ज ः विवेक  कोल्हे
रेणापूर बाजार समिती निवडणूक 51 उमेदवार रिंगणात

मुंबई प्रतिनिधी – महाराष्ट्रातील लोकसभेच्या ४८ जागांबाबत महायुतीमध्ये अद्याप तोडगा निघालेला नाही. मुंबईतील बैठकीत निर्णय न झाल्यानं अमित शाह यांच्या उपस्थितीत दिल्लीत बैठक झाली. दिल्लीतील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सुनील तटकरे, प्रफुल पटेल यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली आहे. या बैठकीतही जागावाटपावर अंतिम तोडगा निघाला नसल्याची माहिती आहे. दिल्लीत येत्या दोन दिवसांमध्ये पुन्हा बैठक होईल अशी माहिती आहे. भाजपनं गेल्या लोकसभा निवडणुकीत २५ जागा लढवलेल्या होत्या. यावेळी भाजपचा ३२ ते ३५ जागा लढवण्याचा प्रयत्न आहे. यामुळे मित्रपक्ष असलेल्या एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस यांची चिंता वाढली आहे.

भाजप लोकसभेच्या जागा वाटपात ३२ ते ३५ जागा लढवून मित्रपक्ष असलेल्या एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षांना मोजक्या जागा सोडण्याची शक्यता आहे. यावरुन जागा वाटपाची चर्चा अडलेय. अमित शाह यांनी शिंदे आणि पवारांना जिंकू शकणाऱ्या जागा देऊ असं म्हटलं होतं. भाजपच्या या भूमिकेमुळं एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना नेत्यांच्या नाराजीची भीती आणि सोबत आलेल्या काही नेत्यांच्या घरवापसीची भीती वाटत असल्याची चर्चा आहे.

COMMENTS