Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अकोले शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

अकोले ः अकोले तालुक्यातील जांभळेवाडी केंद्रातील दुर्गम भागातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा त्रिशूळवाडी तालुका अकोले शाळेतील विद्यार्थ्यांना शिवकल्

उद्यापासून शेतकऱ्याच्या बांधावर नुकसानीचे पंचनामे : आ.आशुतोष काळें
2024 ला राज्याच्या तसेच देशाच्या राजकारणात खूप मोठे बदल झालेले दिसतील – बाळासाहेब थोरात 
‘गौतम’चा गणित-विज्ञान प्रदर्शनात द्वितीय, चित्रकलेत प्रथम क्रमांक

अकोले ः अकोले तालुक्यातील जांभळेवाडी केंद्रातील दुर्गम भागातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा त्रिशूळवाडी तालुका अकोले शाळेतील विद्यार्थ्यांना शिवकल्याण फाउंडेशन वाघोली, पुणे यांच्यावतीने व फोपसंडी येथील आदिवासी सेवक दत्तात्रय मुठे यांच्या सहकार्यामुळे विद्यार्थ्यांना  स्कूल बॅग, पाणी बॉटल, वह्या, कंपास, पेन, व पॅड यांचे वाटप सातेवाडीचे लोकनियुक्त सरपंच बुळे, ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मण मुठे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षश्री भास्कर जोशी, जिजाराम मुठे, एकनाथ मुठे, लुमा मुठे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. शाळेसाठी व केंद्रासाठी  शिक्षण विस्तार अधिकारी अरविंद कुमावत व केंद्रप्रमुख भवरे यांचे वेळोवेळी मार्ग दर्शन लाभले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक विकास झरेकर, उपाध्यापक बाळासाहेब वळे व ग्रामस्थ उपस्थित होते.

COMMENTS