Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

चांद्रयान-3 चे चंद्रावर यशस्वी लैंडिंगचा राहात्यात जल्लोष

राहाता/प्रतिनिधी ः ’इस्रो’च्या चांद्रयान-3 चे चंद्रावर यशस्वी लैंडिंग झाले आहे. भारतातील 140 कोटी जनतेची मान आज अभिमानाने वर गेली. चंद्रावर उतरून

इन्स्पायर अबँकस स्पर्धेत जान्हवी टेकाळे प्रथम
Ahmednagar : पगाराच्या स्लीपची मागणी करत बायकोचा शासकीय कार्यालयात धिंगाणा (Video)
क्रांतीवीर राघोजी भांगरेंचा स्मृतीस्तंभ उभारणार : निरंजन डावखरे

राहाता/प्रतिनिधी ः ’इस्रो’च्या चांद्रयान-3 चे चंद्रावर यशस्वी लैंडिंग झाले आहे. भारतातील 140 कोटी जनतेची मान आज अभिमानाने वर गेली. चंद्रावर उतरून भारताने इतिहास रचला आहे. हा क्षण अविस्मरणीय आहे. चांद्रयान-3 चे चंद्रावर यशस्वी लैंडिंगचा राहात्यात मोठा जल्लोष करण्यात आला.

चांद्रयान-3 च्या यशस्वी लैंडीगने सध्या प्रत्येक भारतीय जल्लोष करत आहे. हि गोष्ट भारतासाठी हा अभिमानास्पद क्षण आहे, या ऐतिहासिक घटनेकडे भारतातील नागरिकांच्या लक्ष लागले होते लागल्या होते. अनेकांनी हे लँडिंग व्यवस्थित पार पडावे यासाठी अनेकांनी प्रार्थना केल्या होत्या लैंडिंगचा क्षण जवळ येत होता, तसतशी प्रत्येकाची धाकधूक वाढत होती. सायंकाळी सहा वाजून चार मिनिटांनी चंद्रयान 3 ची बातमी आली चंद्रयान- 3 ची मोहीम फत्ते झाली. हे कळतात अनेकांनी फटाके फोडून आनंद उत्सव साजरा केला. त्याचप्रमाणे भारतातील नागरिक काही परदेशात असल्याने त्यांनीही सुद्धा यावेळी आनंद उत्सव साजरा केला. राहाता शहरा व ग्रामीण भागामध्ये मोठा जल्लोष करण्यात आला. काही नागरिकांनी पेढे वाटून भारत माता की जयचा जयघोष केला. आनंद उत्सव साजरा करत इस्त्रो’ आणि तेथील शास्त्रज्ञांना शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी राहाता प्रेस क्लब अध्यक्ष रामभाऊ लोंढे, उपाध्यक्ष दिलीपराव खरात, संदीप वाव्हळ,बाळासाहेब सोनावणे,आदर्श शिक्षक सर्जेराव मते,विजय शिंदे, प्रमोद तोरणे,भगवत आरणे,सुनील बोठे,धनंजय वाकचौरे, बाळासाहेब सोनटक्क्के,शन्कर येवलेकर,भालचन्द्र लोंढे श्रीनिवास लोंढे आदिंसह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

-प्रतिक्रिया ः चंद्रयान-2 मध्ये अपयश आले. तरीही भारताने हार मानली नाही. जिद्द व चिकटेच्या जोरावर पुन्हा भारताने चंद्रयान-3 मोहिमेला सुरुवात केली. या मोहिमेला चांगल्या प्रकारचे यश आले.ही गोष्ट भारतासाठी खूप अभिमानाची बाब आहे.- योगेश तिय्या ,सामाजिक कार्यकर्ते, शिर्डी.


COMMENTS