Homeताज्या बातम्या

लोककलेचा स्वर हरपला ; डॉ. तीजन बाई यांचे निधन

रायपूर : छत्तीसगडच्या लोकसंस्कृतीचा जागतिक स्तरावर गौरव वाढविणार्‍या आणि ‘पंडवानी’ या लोकपरंपरेला नवे आयाम देणार्‍या ज्येष्ठ लोकगायिका, पद्मविभूष

वाढत्या गुन्हेगारीवरुन भुजबळांचा पोलिस आयुक्तांना इशारा 
मुद्रांक नोंदणी प्रकरणातील गैरव्यवहारांची एजी कार्यालयामार्फत होणार राज्यस्तरीय चौकशी; विशेष टास्क फोर्स स्थापन होणार
आरक्षणासाठी अहिल्यादेवींच्या चरणी प्राणाहुती देण्यास तयार
INC Maharashtra | छत्तीसगडची प्रसिद्ध लोककला 'पंडवानी' ही आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवणाऱ्या, महान लोकगायिका आणि पद्मविभूषण पुरस्कार विजेत्या ...


रायपूर : छत्तीसगडच्या लोकसंस्कृतीचा जागतिक स्तरावर गौरव वाढविणार्‍या आणि ‘पंडवानी’ या लोकपरंपरेला नवे आयाम देणार्‍या ज्येष्ठ लोकगायिका, पद्मविभूषण डॉ. तीजन बाई यांचे रविवारी निधन झाले. त्या सत्तर वर्षांच्या होत्या. रायपूर येथील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत उपचार सुरू असताना त्यांनी अखेरचा श्‍वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्या दीर्घकालीन आजाराने त्रस्त होत्या.
त्यांच्या निधनामुळे भारतीय लोककला विश्‍वावर शोककळा पसरली असून देशभरातील कलाकार, साहित्यिक, सांस्कृतिक संस्था आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. लोकपरंपरेचे जतन आणि संवर्धन करणार्‍या एका युगप्रवर्तक व्यक्तिमत्त्वाचा अंत झाल्याची भावना व्यक्त केली जात आहे. डॉ. तीजन बाई यांनी आपल्या प्रभावी आवाज, जिवंत अभिनय आणि ओघवत्या कथनशैलीच्या बळावर ‘पंडवानी’ या लोककलाप्रकाराला देशाच्या सीमांपलीकडे नेले. महाभारतातील कथा त्यांनी अत्यंत उत्कटतेने सादर केल्या. त्यांच्या सादरीकरणात केवळ गायन नव्हते, तर अभिनय, भावमुद्रा आणि कथानकाची सखोल जाण यांचे अद्वितीय मिश्रण होते. त्यामुळे रसिक मंत्रमुग्ध होत असत. पुरुषांचे वर्चस्व मानल्या जाणार्‍या ‘कापालिक’ शैलीत पंडवानी सादर करणार्‍या त्या पहिल्या महिला कलाकार ठरल्या. या परंपरेत त्यांनी स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आणि अनेक महिलांसाठी प्रेरणादायी उदाहरण बनल्या. त्यांच्या कार्यामुळे लोककलेतील स्त्रियांच्या सहभागाला नवी दिशा मिळाली. डॉ. तीजन बाई यांचा जन्म छत्तीसगडमधील गनियारी या गावात अत्यंत सामान्य कुटुंबात झाला. वडील हुनुकलाल परधा आणि आई सुखवती यांच्या संस्कारात त्यांचे बालपण गेले. आर्थिक अडचणी, सामाजिक बंधने आणि प्रतिकूल परिस्थिती यांचा सामना करत त्यांनी लोककलेचा ध्यास कायम ठेवला.

COMMENTS