Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अहमदनगरच्या उड्डापुलाचे उद्घाटन करण्याची घाई कशासाठी ?

पिलरवर शिवरायांचे चित्र रेखाटून त्यांचा अवमान करण्याची सुपीक कल्पना कुणाची ?

अहमदनगर विशेष प्रतिनिधी - अहमदनगरचा ऐतिहासिक उड्डाणपूल व्हावा अशी अनेकांची इच्छा अनेक वर्षांपासून होती. पुलासाठी तब्बल एक दशक संघर्ष करावा लागल

श्रीगोंद्यात शिवसेनेची महिला शाखा कार्यकारिणी जाहीर
अखेर महिला अत्याचारप्रकरणी गोविंद मोकाटेला झाली अटक
नवरात्रोत्सवानिमित्त समता स्कूच्या सांस्कृतिक कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद

अहमदनगर विशेष प्रतिनिधी – अहमदनगरचा ऐतिहासिक उड्डाणपूल व्हावा अशी अनेकांची इच्छा अनेक वर्षांपासून होती. पुलासाठी तब्बल एक दशक संघर्ष करावा लागला ही खेदाचीच गोष्ट म्हणावी लागेल. मात्र हा पूल अस्तित्वात आला असून, 19 नोव्हेंबर रोजी या पुलाचे उद्धाटन केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. वास्तविक पाहता पुलाचे कामकाज बाकी असतांना, पुलाचे उद्घाटन करण्याची घाई कशासाठी करण्यात आली, असा सवाल निर्माण झाल्याशिवाय राहत नाही.
पुलाचे काम वेगाने करण्यात आले, याचे कौतुक सगळयांनाच आहे. मात्र पुलाचे अनेक ठिकाणी सुशोभीकरणाचे काम प्रलंबित आहे. तसेच पुलाच्या खाली अजूनही काम सुरु असतांना, उद्धाटनाची घाई कशासाठी केली. त्याचबरोबर या पुलाच्या पिलरवर छत्रपती शिवरायांचे चित्र रेखाटण्याची सुपीक कल्पना कुणाच्या डोक्यातून समोर आली. कारण या पिलरवरील फोटोंचे जर तुम्ही बारकाईने निरीक्षण केले, तर त्याच पुलाच्या एका बाजूला वरुन पडलेले मातीमिश्रीत पाण्याचे ओघळ दिसतात. तर दुसरीकडे शिवरायांच्या देखाव्याचे चित्र. या चित्रातील कलर देखील अवघ्या काही दिवसांत काळवंडून गेले आहेत. त्यामुळे शिवरायांचा अवमान करण्याची तर ही सुपीक कल्पना नव्हती ना ?
एकीकडे राज्यात अरबी समुद्रातील शिवस्मारक प्रलंबित आहे. राज्यात आणि केंद्रात देखील भाजपची सत्ता असतांना, अजूनही या स्मारकाच्या कामाची मुहूर्तमेढ रोवली गेली नाही. असे असतांना, अहमदनगरच्या उड्डाणपुलावर छत्रपती शिवरांयांचे चित्र रेखाटून संबंधितांनी कोणते ईप्सित साध्य केले. पुलाचे उद्धाटन झाल्यानंतर दुसर्‍याच दिवशी पुल सार्वजनिक वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. याच पुलावर दोन्ही बाजूने, उतरतांना आणि चढतांना मोठ-मोठे स्पीडबे्रकर टाकल्यामुळे अपघात झाले. तर दुसरीकडे याच पुलावर सायंकाळी अनेक प्रेमीयुगल गाडया उभे करून, निवांत लव्ह पॉईंटसारखे गप्पा मारतांना देखील दिसून येतात. त्यामुळे पुल अस्तित्वात आल्यानंतर देखील अनेक प्रश्‍नचिन्ह निर्माण होतांना दिसून येत आहे. केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी शहरात आल्यानंतर शहरातील भाजपने त्यांना एकदा शहराची सैर घडवून आणली असती, म्हणजे त्यांना देखील अहमदनगरचे रस्ते आणि त्यासाठी शहर भाजप काय प्रयत्न करत आहेत, विद्यमान आमदार आणि खासदार काय प्रयत्न करत आहेत, याचा अनुभव आला असता. पूल अस्तित्वात आल्यानंतर अनेक प्रश्‍न उभे होतांना दिसून येत आहे.

COMMENTS