Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गुरुकुलमध्ये आधुनिक संगणक लॅबचे उद्घाटन 

कर्जत : शिक्षणाच्या नव्या क्षितिजाला गवसणी घालत न्यू गुरुकुल इंग्लिश स्कूलमध्ये कै. भगवंतराव बळवंतराव लांगोरे (आप्पा) यांच्या जयंतीदिनी अत्याधुनिक संगणक लॅबचे उद्घाटन पार पडले. या  प्रसंगी  विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार रवी सतवन, गटशिक्षणाधिकारी संजय कळमकर (नेवासा) तसेच स्थानिक निधी लेखापरीक्षा विभागाचे सहाय्यक संचालक रमेश कासार (अहिल्यानगर) उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे मार्गदर्शक संभाजी लांगोरे विराजमान होते.  यावेळी पीआरएम सॉफ्ट प्रायव्हेट लिमिटेड, पुणे येथील सीईओ राजेंद्र शिंदे यांनी शाळेला १३ संगणक व एक इंटरऍक्टिव्ह पॅनल भेट देऊन ज्ञानदानाची अनमोल परंपरा पुढे नेली. त्यांच्या या योगदानामुळे विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडले जाण्याची संधी मिळणार असून, डिजिटल शिक्षणाच्या माध्यमातून त्यांचा आत्मविश्वास अधिक दृढ होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. संभाजी लांगोरे यांनी राजेंद्र शिंदे यांच्या कार्याचे कौतुक करत सर्व उपस्थितांचे आभार मानले. या  कार्यक्रमास किरण नाईक (समन्वयक), शिवाजी पाटील (मुख्याध्यापक), राजेंद्रकुमार काळे (पर्यवेक्षक) तसेच शिक्षकवृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा सोहळा केवळ संगणक लॅबच्या उद्घाटनापुरता मर्यादित न राहता विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल डिजिटल भविष्यासाठी टाकलेले एक भक्कम आणि दूरदृष्टीपूर्ण पाऊल ठरले.

‘समर्थ क्रॉप केअर’कडून कोट्यवधींची फसवणूक; वाढीव व्याजाचे आमिष; एजंट-गुंतवणूकदार हाणामारीनंतर प्रकार समोर
उन्हाच्या झळांत पशुपक्ष्यांसाठी ‘जीवनदायी’ पाणवठा
राहात्यात आजही रंगतो ‘गळी लागण्याचा’ थरार! हवेत लटकत ‘गळवंती’ ला लावली जातात लहान मुले;  शेकडो वर्षांच्या परंपरेचे जतन

कर्जत : शिक्षणाच्या नव्या क्षितिजाला गवसणी घालत न्यू गुरुकुल इंग्लिश स्कूलमध्ये कै. भगवंतराव बळवंतराव लांगोरे (आप्पा) यांच्या जयंतीदिनी अत्याधुनिक संगणक लॅबचे उद्घाटन पार पडले. या  प्रसंगी  विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार रवी सतवन, गटशिक्षणाधिकारी संजय कळमकर (नेवासा) तसेच स्थानिक निधी लेखापरीक्षा विभागाचे सहाय्यक संचालक रमेश कासार (अहिल्यानगर) उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे मार्गदर्शक संभाजी लांगोरे विराजमान होते.

 यावेळी पीआरएम सॉफ्ट प्रायव्हेट लिमिटेड, पुणे येथील सीईओ राजेंद्र शिंदे यांनी शाळेला १३ संगणक व एक इंटरऍक्टिव्ह पॅनल भेट देऊन ज्ञानदानाची अनमोल परंपरा पुढे नेली. त्यांच्या या योगदानामुळे विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडले जाण्याची संधी मिळणार असून, डिजिटल शिक्षणाच्या माध्यमातून त्यांचा आत्मविश्वास अधिक दृढ होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

संभाजी लांगोरे यांनी राजेंद्र शिंदे यांच्या कार्याचे कौतुक करत सर्व उपस्थितांचे आभार मानले. या  कार्यक्रमास किरण नाईक (समन्वयक), शिवाजी पाटील (मुख्याध्यापक), राजेंद्रकुमार काळे (पर्यवेक्षक) तसेच शिक्षकवृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा सोहळा केवळ संगणक लॅबच्या उद्घाटनापुरता मर्यादित न राहता विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल डिजिटल भविष्यासाठी टाकलेले एक भक्कम आणि दूरदृष्टीपूर्ण पाऊल ठरले.

COMMENTS