Homeताज्या बातम्या

‘एसएसजीएम’च्या सहा विद्यार्थ्यांची रिसर्च असोसिएटसाठी निवड; कोपरगाव महाविद्यालयात प्लेसमेंट ड्राइव्ह

कोपरगाव : रयत शिक्षण संस्थेच्या श्री सद्गुरु गंगागीर महाराज (SSGM) सायन्स, गौतम आर्ट्स आणि संजीवनी कॉमर्स महाविद्यालय, कोपरगाव येथील रसायनशास्त्र

संजीवनीच्या आकांक्षा भास्करची नौदलात निवड; उपलेफ्टनंट पदाला गवसणी, शेतकरी कुटुंबातील लेकीची मोठी झेप
धोंडा खायला बोलावले नाही म्हणून वकील पत्नीस मारहाण; श्रीरामपूर शहर पोलिसांत तिघांवर गुन्हा दाखल
शेवगावमध्ये ३६० वा साप्ताहिक शिवअभिषेक सोहळा उत्साहात

कोपरगाव : रयत शिक्षण संस्थेच्या श्री सद्गुरु गंगागीर महाराज (SSGM) सायन्स, गौतम आर्ट्स आणि संजीवनी कॉमर्स महाविद्यालय, कोपरगाव येथील रसायनशास्त्र विभाग, प्लेसमेंट सेल आणि अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष (IQAC) यांच्या संयुक्त विद्यमाने कॅम्पस प्लेसमेंट ड्राइव्हचे आयोजन करण्यात आले होते.

या उपक्रमात ‘किनोमेरा बायोसायन्सेस प्रा. लि., मुंबई’ या नामांकित कंपनीच्या सहकार्याने विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेण्यात आल्या. या कॅम्पस प्लेसमेंट ड्राइव्हमधून पदव्युत्तर ऑर्गेनिक केमिस्ट्रीचे (M.Sc. Organic Chemistry) विद्यार्थी वैभव काजळे, बबन पावळे, गणेश भोसले, अमित मापारी, राहुल आहेर आणि प्रशांत निकम या सहा जणांची ‘रिसर्च असोसिएट’ पदासाठी निवड करण्यात आली आहे.

कंपनीच्या वतीने डॉ. ज्ञानेश्वर पाचरणे यांनी विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतल्या. विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल रयत शिक्षण संस्थेचे व्हा. चेअरमन ॲड. भगीरथ शिंदे, मॅनेजिंग कौन्सिल सदस्य ॲड. संदीप वर्पे, चैताली काळे, आमदार विवेक कोल्हे, सुनील गंगुले, बाळासाहेब आव्हाड, उपप्राचार्य डॉ. बंडेराव तऱ्हाळ, डॉ. घनश्याम भगत, डॉ. अर्जुन भागवत, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. दिलीप भोये, रसायनशास्त्र विभागप्रमुख डॉ. प्रतिभा रांधवणे व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.

COMMENTS