Homeताज्या बातम्या

अंध विद्यार्थ्यांतील गुणांना प्रोत्साहन देणे गरजेचे; भाजप नेते डॉ. राजेंद्र पिपाडा यांचे प्रतिपादन

शिर्डी : अंध विद्यार्थ्यांमध्ये दडलेले गुण ओळखून त्यांना प्रोत्साहन देत समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन भाजप नेते

वृद्धांसाठी घरपोच ‘हयाती’ची नोंदणी; कर्जतमधील नगरसेविका नीता कचरे यांचा अनोखा उपक्रम
सुरत-चेन्नई महामार्गग्रस्त शेतकऱ्यांना चांगला मोबदला मिळावा; बाळासाहेब थोरातांची केंद्रीय मंत्री नितीन गडकरींशी चर्चा
सरसेनापती माणकोजी दहातोंडेंवर येणार पहिला पोवाडा; शिवशाहीर अक्षय डांगरे करणार सादरीकरण

शिर्डी : अंध विद्यार्थ्यांमध्ये दडलेले गुण ओळखून त्यांना प्रोत्साहन देत समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन भाजप नेते डॉ. राजेंद्र पिपाडा यांनी केले. ‘दि बुद्धिस्ट असोसिएशन फॉर द ब्लाइंड, नाशिक’ यांच्या वतीने दहावी व बारावीच्या परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या दृष्टिहीन गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला, याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून डॉ. पिपाडा बोलत होते.

ते म्हणाले, “दृष्टिहीन विद्यार्थी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून शिक्षणाच्या बळावर यश संपादन करीत आहेत. त्यांचे यश संपूर्ण समाजासाठी प्रेरणादायी आहे. अशा विद्यार्थ्यांच्या पाठीशी समाजाने खंबीरपणे उभे राहून त्यांना शिक्षण, रोजगार आणि स्वावलंबनाच्या संधी उपलब्ध करून दिल्या पाहिजेत.”

दृष्टिहीन बांधवांच्या विविध प्रश्नांसंदर्भात पूर्वी दिवंगत आर. आर. पाटील यांच्यासमवेत शिष्टमंडळाची चर्चा घडवून आणली होती, याची आठवण करून देत, यापुढेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दृष्टिहीन बांधवांच्या मागण्यांचा सकारात्मक पाठपुरावा करणार असल्याचे डॉ. पिपाडा यांनी सांगितले. कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष सतीश निकम यांनी संस्थेच्या सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांची माहिती दिली.

या सोहळ्याला सतीश निकम, चिंतामण अहिर, राजाराम गायकवाड, संजय घोडेराव, रणजित बोठे, रामनाथ सदाफळ, अनिल सोमवंशी, नवनाथ सदाफळ यांच्यासह पालक, विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS