Homeताज्या बातम्या

ड्रग्ज इन्स्पेक्टरपदी मनिषा जाधव-कुटे यांची निवड; मारफळा गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (चझडउ) आयोजित 2026 च्या स्पर्धा परीक्षेत गेवराई तालुक्यातील मारफळा येथील कु. मनिषा जाधव-कुटे यांनी दैदिप्यमान यश सं

आरटीई प्रवेशासाठी 30 एप्रिलपर्यंत मुदतवाढ; बोगस कागदपत्रांवर कारवाईची मागणी
साहित्य भारतीच्या प्रांतउपाध्यक्षपदी द.ल. वारे यांची निवड
बीड जिल्ह्यातील राष्ट्रीय लोकअदालतमध्ये 1599 प्रकरणे निकाली



महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (चझडउ) आयोजित 2026 च्या स्पर्धा परीक्षेत गेवराई तालुक्यातील मारफळा येथील कु. मनिषा जाधव-कुटे यांनी दैदिप्यमान यश संपादन केले आहे. त्यांची महाराष्ट्र शासनाच्या अन्न व औषध प्रशासन विभागातील ‘ड्रग्ज इन्स्पेक्टर’ (औषध निरीक्षक), वर्ग-2 गट-ब या अत्यंत जबाबदारीच्या व प्रतिष्ठित पदावर निवड झाली आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशाने मारफळा गावासह संपूर्ण गेवराई तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, बीड जिल्ह्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.मनिषा जाधव-कुटे यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीचा सामना करत जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या बळावर आपले उच्च शिक्षण पूर्ण केले. त्यांनी औषधनिर्माणशास्त्र (इ. झहरीारलू) पदवी प्राप्त केल्यानंतर ॠझ-ढ आणि छखझएठ या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवले. त्यानंतर त्यांनी छखझएठ, गुवाहाटी येथून च.ड. झहरीारलर्शीींळलरश्र -परश्रूीळी हे उच्च शिक्षण पूर्ण केले. उच्च शिक्षणासोबतच प्रशासकीय सेवेत जाण्याचे ध्येय उराशी बाळगून त्यांनी चझडउ स्पर्धा परीक्षेच्या तयारीला सुरुवात केली. योग्य नियोजन, अभ्यासातील सातत्य, कठोर परिश्रम आणि अढळ निष्ठा यांच्या जोरावर त्यांनी परीक्षेच्या प्रत्येक टप्प्यात उल्लेखनीय कामगिरी करत अखेर ड्रग्ज इन्स्पेक्टर पदाला गवसणी घातली.
त्यांच्या निवडीचे वृत्त समजताच मारफळा व परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले. ग्रामस्थांनी पेढे वाटून आणि फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष साजरा केला. ग्रामीण भागातील एका विद्यार्थिनीने कठीण स्पर्धा परीक्षेत यश संपादन केल्याने परिसरातील विद्यार्थिनींसाठी त्या प्रेरणास्थान ठरल्या आहेत. त्यांच्या या यशाबद्दल राजकीय, सामाजिक, शैक्षणिक व प्रशासकीय क्षेत्रातील विविध मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
 विशेष म्हणजे, मनिषा जाधव-कुटे यांचे हे यश केवळ वैयक्तिक यश नसून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरले आहे. सातत्यपूर्ण अभ्यास, योग्य मार्गदर्शन आणि प्रबळ इच्छाशक्तीच्या बळावर कोणतेही ध्येय साध्य करता येते, हे त्यांनी आपल्या यशातून सिद्ध करून दाखवले आहे.
यशाचे श्रेय कुटुंबाला; प्रामाणिक सेवेचा संकल्प
हे यश केवळ माझे एकटीचे नसून, प्रत्येक कठीण प्रसंगी मला खंबीरपणे साथ देणारे माझे कुटुंब, पती राजू कुटे आणि मार्गदर्शकांचे आहे. औषध निरीक्षक म्हणून प्रशासकीय सेवेत रुजू झाल्यावर नागरिकांना दर्जेदार व सुरक्षित औषधे उपलब्ध व्हावीत, तसेच औषध क्षेत्रातील नियमन अधिक पारदर्शक आणि गतिमान राहावे, यासाठी मी पूर्ण निष्ठेने व प्रामाणिकपणे कार्य करेन.
– मनिषा जाधव-कुटे (नवनिर्वाचित ड्रग्ज इन्स्पेक्टर)

COMMENTS