Homeताज्या बातम्या

शनैश्वर देवस्थानच्या दानपात्रात ४९ लाखांचे दान; १७ ग्रॅम सोने, ४८२ ग्रॅम चांदीही अर्पण

सोनई: श्री क्षेत्र शनिशिंगणापूर येथील श्री शनैश्वर देवस्थानाच्या दानपात्रांची मोजणी शुक्रवारी (दि. १७) कार्यकारी अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी अतुल

खासदार संजय दिना पाटलांची पत्रकारांना कॅमेऱ्यासमोर शिवीगाळ; सत्तेत जाताच वाढली मुजोरी, राज्यभरातून तीव्र संताप
ग्रामीण महाराष्ट्राचा कायापालट! ‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ अभियानाचा दिमाखात शुभारंभ
गौतम पब्लिक स्कूलमध्ये विविध उपक्रम उत्साहात; चैताली काळे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध स्पर्धा संपन्न
श्री शनिश्वर देवस्थान शनिशिंगणापुर

सोनई: श्री क्षेत्र शनिशिंगणापूर येथील श्री शनैश्वर देवस्थानाच्या दानपात्रांची मोजणी शुक्रवारी (दि. १७) कार्यकारी अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी अतुल चोरमारे यांच्या देखरेखीखाली पार पडली. गेल्या पाच आठवड्यांत भाविकांनी अर्पण केलेल्या दानातून ४९ लाख २५ हजार ६४६ रुपयांची रोख रक्कम जमा झाली असून, त्याचबरोबर १७.५ ग्रॅम सोने व ४८२ ग्रॅम चांदीही दानपात्रातून प्राप्त झाली आहे.

शनी मंदिरासमोरील उदासी महाराज मठात सीसीटीव्ही देखरेख व व्हिडिओ चित्रीकरणाच्या साक्षीने दानपात्रांची मोजणी करण्यात आली. पारदर्शकता राखण्यासाठी संपूर्ण प्रक्रिया भाविकांना पाहता येईल अशा पद्धतीने पार पडली. यावेळी मंदिर परिसरातील एकूण १८ दानपात्रांमधील जमा रकमेची मोजणी करण्यात आली.

मोजणीदरम्यान ४६ लाख ७७ हजार ३४६ रुपयांच्या नोटा व २ लाख ४८ हजार ३०० रुपयांची चिल्लर आढळली. तसेच १७.५ ग्रॅम सोने (अंदाजे किंमत २ लाख २५ हजार १२० रुपये) आणि ४८२ ग्रॅम चांदी (अंदाजे किंमत ७८,३३७ रुपये) प्राप्त झाली. मोजणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ही सर्व रक्कम देवस्थानच्या बँक खात्यात जमा करण्यात आली आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार श्री शनैश्वर देवस्थानचा प्रशासकीय कारभार नाशिक विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्याकडे असून, देवस्थानचे दैनंदिन कामकाज कार्यकारी अधिकारी अतुल चोरमारे पाहत आहेत. दानपात्र मोजणीवेळी देवस्थानचे सुरक्षा अधिकारी गोरख भीमाशंकर दरंदले यांच्या मार्गदर्शनाखाली कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती, तर सोनई पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक धनवटे यांच्या नेतृत्वाखाली कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

मिळालेले एकूण दान:

  • नोटा: ४६ लाख ७७ हजार ३४६ रुपये
  • चिल्लर: २ लाख ४८ हजार ३०० रुपये
  • सोने: १७.५ ग्रॅम (अंदाजे किंमत २ लाख २५ हजार १२० रुपये)
  • चांदी: ४८२ ग्रॅम (अंदाजे किंमत ७८,३३७ रुपये)

COMMENTS