Homeविदेश

इराण-इस्रायल संघर्ष पुन्हा भडकलाक्षेपणास्त्र हल्ले, प्रतिहल्ल्यांनी मध्यपूर्वेत तणाव शिगेला

तेहरान/वॉशिंग्टन : दोन महिन्यांपूर्वी झालेल्या युद्धविरामानंतर इराण आणि इस्रायल यांच्यातील संघर्ष पुन्हा उफाळून आला असून, दोन्ही देशांनी एकमेकांव

चीनच्या राष्ट्राध्यक्षांना भेटले पुतीन
टेक्सासमध्ये भारतीय ध्वजाचा अवमान करत ‘इमिग्रेशन’ विरोधात निदर्शने; स्थानिक नागरिकाच्या संतापजनक कृत्याचा व्हिडिओ व्हायरल
इराण-इस्रायल संघर्षाच्या पार्श्वभूमीवर इराणी जनता लष्कराच्या समर्थनार्थ रस्त्यावर


तेहरान/वॉशिंग्टन : दोन महिन्यांपूर्वी झालेल्या युद्धविरामानंतर इराण आणि इस्रायल यांच्यातील संघर्ष पुन्हा उफाळून आला असून, दोन्ही देशांनी एकमेकांविरुद्ध लष्करी कारवाया तीव्र केल्या आहेत. इराणने रविवारी रात्री इस्रायलमधील विविध भागांवर क्षेपणास्त्रांचा मारा केला, तर त्यानंतर काही तासांतच इस्रायलने इराणमधील लष्करी ठिकाणांवर प्रतिहल्ले चढवले. या घडामोडींमुळे संपूर्ण मध्यपूर्वेत तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
इराणच्या इस्लामिक क्रांती रक्षक दलाने लेबनॉनमधील हिजबुल्लाह संघटनेवर झालेल्या इस्रायली कारवायांच्या निषेधार्थ हा हल्ला केल्याचा दावा केला आहे. क्षेपणास्त्र हल्ल्यांनंतर इस्रायलमधील अनेक शहरांमध्ये धोक्याचे इशारे देणारे भोंगे वाजविण्यात आले आणि नागरिकांना सुरक्षित आश्रयस्थानी हलविण्यात आले. याला प्रत्युत्तर म्हणून इस्रायली सैन्याने पश्‍चिम आणि मध्य इराणमधील लष्करी तळांना लक्ष्य केल्याची माहिती दिली. इराणमधील तेहरान, तब्रीज आणि इस्फहान या शहरांमध्ये स्फोट झाल्याच्या बातम्या स्थानिक वृत्तसंस्थांनी दिल्या आहेत. काही औद्योगिक आणि लष्करी ठिकाणांचे नुकसान झाल्याचेही वृत्त आहे. संघर्ष तीव्र होताच इराणने राजधानी तेहरानजवळील इमाम खोमेनी आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरातील हवाई क्षेत्र बंद केले. त्याचबरोबर इराकने 72 तासांसाठी, तर सीरियाने 12 तासांसाठी आपली हवाई हद्द बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय विमान वाहतुकीवरही परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ऊेपरश्रव र्ढीीाि यांनी परिस्थिती अधिक चिघळू नये यासाठी संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे. वृत्तांनुसार, त्यांनी इस्रायलचे पंतप्रधान इशपक्षराळप छशींरपूरर्ही यांना व्यापक प्रतिहल्ला टाळण्याचा सल्ला दिला होता. मात्र त्यानंतरही इस्रायलने लष्करी कारवाई सुरू ठेवली.
येमेनमधील हुथी बंडखोरांनी इस्रायलवरील क्षेपणास्त्र हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारल्याचा दावा केला आहे. इस्रायलच्या संवेदनशील ठिकाणांना लक्ष्य करण्यात आल्याचे सांगत त्यांनी लाल समुद्रातील इस्रायली सागरी वाहतुकीवर निर्बंध लावण्याची घोषणा केली आहे. वाढत्या तणावाच्या पार्श्‍वभूमीवर पंतप्रधान नेतन्याहू यांनी आज उच्चस्तरीय सुरक्षा बैठकीचे आयोजन केले आहे. या बैठकीत इराणच्या ताज्या कारवायांचे मूल्यमापन, इस्रायलची पुढील भूमिका आणि संभाव्य लष्करी पर्यायांवर चर्चा होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
अमेरिका जबाबदार असल्याचा इराणचा आरोप
इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने सध्याच्या संघर्षासाठी अमेरिकेला जबाबदार धरले आहे. मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बघाई यांनी इस्रायलच्या कारवायांना वॉशिंग्टनचा अप्रत्यक्ष पाठिंबा असल्याचा आरोप केला. या भूमिकेमुळे प्रादेशिक संघर्ष अधिक तीव्र होत असल्याचे त्यांनी म्हटले.
भारतीय नागरिकांनी इराण सोडण्याचे आवाहन
संघर्षाच्या पार्श्‍वभूमीवर भारताने आपल्या नागरिकांसाठी विशेष सूचना जारी केली आहे. इराणला अनावश्यक प्रवास टाळावा तसेच तेथे वास्तव्यास असलेल्या भारतीयांनी उपलब्ध वाहतूक सुविधांचा वापर करून शक्य तितक्या लवकर सुरक्षित स्थळी रवाना व्हावे, असे आवाहन भारतीय दूतावासाने केले आहे. परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून आवश्यक ती मदत केली जाईल, असेही दूतावासाने स्पष्ट केले.

COMMENTS