Homeताज्या बातम्यासंपादकीय

ठाकरे गटाची सोयीची भूमिका

मुळातच राजकारणातील वैचारिक गोंधळ तसाच ठेवायचा आणि आपली राजकीय पोळी भाजून घेण्याचे दिवस आता इतिहास जमा होतांना दिसून होत आहे. कारण इतिहास आणि त्या

विकासाचे राजकारण…
तलाठी परीक्षेतील नवा घोळ
राष्ट्रवादी काँगे्रसमधील संभ्रमता

मुळातच राजकारणातील वैचारिक गोंधळ तसाच ठेवायचा आणि आपली राजकीय पोळी भाजून घेण्याचे दिवस आता इतिहास जमा होतांना दिसून होत आहे. कारण इतिहास आणि त्यातील पुरावे सहज उपलब्ध असल्यामुळे हा गोंधळ जास्त वेळ करता येत नाही. आपण आज विरोेधी वक्तव्य केले, तर सोशल मीडियातून आपण त्याच बाजुचे केलेले वक्तव्य दाखवून देत, हा सुर्य आणि जयद्रथ दाखवण्यात येते. त्यामुळे फसवेगिरी, गोंधळ जास्त वेळ करता येत नाही. या बाबी सांगण्याचे कारण म्हणजे  मालेगाव सभेतील उद्धव ठाकरे यांचे भाषण. राज्याच्या राजकारणात पक्षप्रमुख म्हणून असलेल्या उद्धव ठाकरे यांच्या हातातून पक्ष आणि पक्षचिन्ह हिसकावून शिंदे गटाने आपणच शिवसेना असल्याचे सध्यातरी निवडणूक आयोगाच्या निर्णयानुसार दाखवून दिले आहेत. मात्र तरी उद्धव ठाकरे यांची भूमिका गोंधळलेली दिसून येत आहे. एकीकडे भाजपसारख्या मित्र पक्षाने कधीच साथ सोडली आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीची सोबत धरली आहे. मात्र महाविकास आघाडीतील महत्वाचा पक्ष असलेल्या काँगे्रसची विचारधारा ठाकरे गटाला पेलवणारी नसल्याचे मालेगाव सभेतून दिसून आले. कारण काँगे्रस नेते राहुल गांधी असून, गांधी कधी माफी मागत नसल्याचे वक्तव्य केले होते. त्यांचे वक्तव्य पकडून उद्धव ठाकरे यांनी विनायक दामोधर सावरकरांचा त्याग, त्यांची समर्पण वृत्तीचे कौतुक करत, राहुल गांधींना खडेबोल सुनावले. यावरून उद्धव ठाकरेंची भूमिका ही गोंधळाची दिसून येत आहे. एकीकडे महाविकास आघाडीसोबत राहायचे, दुसरीकडे हिंदुत्व जोपासायचे आणि सावरकरांचे कौतुक करायचे, ही त्यांची भूमिका कोणत्याच विचारधारेत बसत नाही. धड इकडची ना धड तिकडची. त्यामुळे ठाकरे आपल्या वैचारिक गोंधळामुळे बॅकफूटववर जातांना दिसून येत आहे. महत्वाचे म्हणजे, कोणत्याही पक्षाला किंवा संघटनेला आपली वाढ करण्यासाठी अशी दुटप्पी भूमिका घेवून चालणार नाही. किंवा असा पक्ष टिकू शकणार नाही. मूळातच ठाकरे गटाने महाविकास आघाडीमध्ये एकत्र आल्यामुळे ठाकरेंचे कडवे हिंदूत्व गळून पडले असून, त्यांनी वैचारिक भूमिका घेतल्यामुळे त्यांना पुरोगामी संघटनांची, नेत्यांची एक सहानुभूती निर्माण झाली. आणि त्यांनी उद्धव ठाकरेंना पाठिंबा दिला. विशेष म्हणजे ठाकरेंची भूमिका जरी कडवट हिंदूत्वाची असली तरी, त्यांचे आजोबा म्हणजे प्रबोधनकार ठाकरे यांचे विचार, ते चांगल्या-चांगल्या पुरोगाम्यांना पेलवणारे नाही. अशा परिस्थितीत उद्धव ठाकरे यांनी घेतलेली भूमिका आपल्या सोयीची असली तरी, त्यामुळे मात्र कार्यकर्त्यांची गोची होणारी आहे. अलीकडच्या काही दिवसांपूर्वीच ठाकरे गटाची बुलंद तोफ असलेल्या सुषमा अंधारे या ठाकरे गटात दाखल झाल्या आहेत. मात्र त्यांना ठाकरे गटाची सावरकरांविषयीची भूमिका पटणार आहे का ? का त्या ती भूमिका पटवून घेणार आहे. ठाकरे गटाने घेतलेल्या सोयीच्या भूमिकेमुळे उलट त्यांची मोठी गोची होतांना दिसून येत आहे. मुळातच कडवट हिंदूत्ववादी मतदार आता बहुसंख्येने भाजपकडे झुकलेला आहे. अशापरिस्थितीत ठाकरे इकडे काँगे्रसच्या मांडीला मांडी लावून बसणार आणि दुसरीकडे ठाकरे गट सावरकरांना कुरवाळणार, ही भूमिका दुटप्पी असल्याचे न कळण्यातइतपत मतदार दूधखुळे नाहीत. महाराष्ट्राच्या राजकारणाला एक वैचारिक वारसा आहे. आणि हा वैचारिक वारसा पुढे घेवून जाण्यासाठी सर्वच पक्षांनी कटिबद्ध असायला हवे. मात्र अलीकडच्या काळात  इतिहास चुकीच्या पद्धतीने मांडून तो आपल्या सोयीप्रमाणे मांडण्याची परंपरा सुरू आहे, ती घातक आहे. जो महापुरूष आपल्या सोयीचा तितकाच वापरायचा अशी पद्धत सुरू आहे. त्यामुळे या राजकीय पक्षांची गोची होतांन दिसून येत आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी देखील स्पष्ट भूमिका घेण्याची गरज आहे.   

COMMENTS