Homeताज्या बातम्याबीड

दरोडा व बलात्काराच्या गुन्हयात आरोपीस 10 वर्षे सक्तमजुरी

बीड दरोडा व बलात्कार केल्याच्या गुन्हयात आरोपी सौरभ गायकवाड यास बीड येथील अतिरीक्त सत्र न्यायाधीश श्री. एस.एस. घोरपडे साहेब यांनी 10 वर्षे सक्तमज

लाच घेताना महावितरणची महिला सहाय्यक अभियंता रंगेहात जेरबंद; एसीबीची आष्टीत धडक कारवाई
Beed Crime ; बीडमध्ये राडा ! रस्त्यावर रक्तच..
सोनाराला लुटणार्‍या टोळीवर मिनी मकोका पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांची धाडसी कारवाई



बीड दरोडा व बलात्कार केल्याच्या गुन्हयात आरोपी सौरभ गायकवाड यास बीड येथील अतिरीक्त सत्र न्यायाधीश श्री. एस.एस. घोरपडे साहेब यांनी 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा दि. 14 मे 2026 रोजी सुनावली आहे. या प्रकरणाकडे बीड जिल्ह्याचे लक्ष वेधलेले होते. सहाय्यक सरकारी वकील अँड. मंजुषा एम. दराडे यांनी केलेल्या प्रभावी युक्तीवादामुळे न्यायालयाने आरोपी सौरभ गायकवाड यास दंडासह शिक्षा सुनावली आहे.
प्रकरणाची थोडक्यात हकीकत अशी की, अंभोरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत फिर्यादी ही तिचे नवर्‍यासोबत अहिल्यानगरहून गावाकडे मोटारसायकलवर येत असताना रस्त्याच्या कडेला थांबली असता तिथे सौरभ गायकवाड व अन्य दोघे आले व त्यांनी प्रथम पिडीतेच्या नवर्‍याला मारहाण केली व अंधारात रस्त्याच्या कडेला नेवून आरोपी सौरभ गायकवाड याने पिडीता हिचेवर बळजबरीने बलात्कार केला. यानंतर पोलीसांची गाडी येत आहे असे दिसल्यावर आरोपी पळुन गेले व जाताना त्यांनी पिडीता व तिचे पतीचा मोबाईल व खिशातील 10,000/- रूपये बळजबरीने घेऊन घटनास्थळावरून पोबारा केला. त्यानंतर पोलीस तेथे आल्यानंतर पिडीतेला प्रथम चिंचोडी पाटील येथील दवाखान्यात व तेथुन अहिल्यानगर येथील सरकारी दवाखान्यात दाखल केले व तिथे पोलीसांनी तिचा जबाब नोंदवल्यावर आरोपी सौरभ गायकवाड व इतर दोघे यांचे विरुध्द भा.द.वि.चे कलम 376, 394 अंतर्गत गुन्हा नोंदवला व सदर गुन्हयाचा तपास अंभोरा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक डी. बी. कोळेकर यांनी करून आरोपी सौरभ गायकवाड याचे विरुध्द दोषारोपपत्र बीड येथील सत्र न्यायालयात दाखल केले. सदर प्रकरणात सरकार पक्षातर्फे 11 साक्षीदार तपासण्यात आले. पिडीतेचा न्यायालयासमोर जबाब व सरकार पक्षाने सादर केलेल्या भक्कम पुराव्यामुळे व सहाय्यक सरकारी वकील अँड. मंजुषा एम. दराडे यांनी केलेल्या प्रभावी युक्तीवादामुळे न्यायालयाने आरोपी सौरभ गायकवाड यास सदर गुन्हयाकामी दोषी धरून त्याला कलम 376 भादवी प्रमाणे 10 वर्षे शिक्षा व रूपये 10,000/- दंड, तसेच कलम 394 भा. द. वि. प्रमाणे 7 वर्षे शिक्षा व रु. 5,000/- दंड तसेच कलम 324 भादवि प्रमाणे 2 वर्षे शिक्षा तसेच कलम 323 भादवि प्रमाणे 6 महिने शिक्षा व 5,000/- रूपये दंड ठोठावला आहे. सदर प्रकरणात सरकार पक्षाच्या वतीने अतिरीक्त सरकारी वकील अँड. मंजुषा एम. दराडे यांनी काम पाहिले. त्यांना अतिरिक्त सरकारी वकील अँड. अजय तांदळे यांनी मदत केली व पैरवी म्हणुन महिला पोलीस जेवे यांनी कामकाज पाहिले.

COMMENTS