Homeताज्या बातम्या

अवैध स्विमिंग पूल ठरला जीवघेणा; इस्लापुरात १३ वर्षीय बालकाचा बुडून मृत्यू, एकाला अटक

किनवट : येथील इस्लापूर भागात विनापरवाना व अनधिकृतपणे सुरू असलेल्या एका स्विमिंग पूलमध्ये बुडून १३ वर्षीय ज्ञानेश्वर गजानन चंद्रे या बालकाचा दुर्द

NEET प्रश्नपत्रिका गैरव्यवहार प्रकरणात आणखी दोघांना अटक; एक डॉक्टर तर दुसरा प्राध्यापक, आतापर्यंत १३ आरोपी ताब्यात
मनीषा हवालदारला सहा दिवसांची सीबीआय कोठडी; नीट पेपरफुटी प्रकरणात कारवाई
‘गणेश’ परिसराच्या वतीने आमदार विवेक कोल्हे यांचा उद्या भव्य नागरी सत्कार
सायखेड्याला १८ वर्षीय युवकाचा बुडून मृत्यू Nashik Marathi News |  18-year-old drowned in Saykheda | Latest Nashik News at Lokmat.com

किनवट : येथील इस्लापूर भागात विनापरवाना व अनधिकृतपणे सुरू असलेल्या एका स्विमिंग पूलमध्ये बुडून १३ वर्षीय ज्ञानेश्वर गजानन चंद्रे या बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना २८ मे रोजी दुपारी घडली. या प्रकरणी मयत बालकाचे नातेवाईक नागनाथ चंद्रे सावरीकर यांच्या फिर्यादीवरून किनवट पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करत मुख्य आरोपी काजी सय्यद मुसीबोद्दीन याला अटक केली आहे. मयत ज्ञानेश्वरचे वडील गजानन चंद्रे हे एसटी महामंडळाच्या किनवट आगारात चालक म्हणून कार्यरत असून, ते मूळचे सावरी (ता. किनवट) येथील रहिवासी आहेत.

२८ मे रोजी दुपारी ज्ञानेश्वर चंद्रे आणि गिरीधर माधव पंडागळे हे दोघे इस्लापूर परिसरातील या स्विमिंग पूलवर पोहण्यासाठी गेले होते. मुलांना पोहता येत नसतानाही तेथील व्यवस्थापन आणि प्रशिक्षित ट्रेनरने त्यांच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. स्विमिंग पूलमध्ये उतरण्यापूर्वी कोणतीही जीवरक्षक सुविधा किंवा आवश्यक असणारे ’लाइफ जॅकेट’ उपलब्ध करून देण्यात आले नव्हते. अत्यंत दुर्गंधीयुक्त पाण्यात मुलांना उतरू दिल्याने व सुरक्षा नियमांचे सरळसरळ उल्लंघन केल्यानेच ज्ञानेश्वरला आपला प्राण गमवावा लागल्याचे तक्रारीत म्हटले आहे. घटनेची गांभीर्य ओळखून किनवट पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणेश कराड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तात्काळ कायदेशीर कारवाई करत आरोपीला गजाआड केले.

विशेष म्हणजे, किनवट नगरपरिषदेपासून काही अंतरावरच आजूबाजूला टीनपत्र्याचे कंपाऊंड उभारून हा स्विमिंग पूल व्यावसायिक तत्त्वावर चालवला जात होता. मुलांसाठी ५० रुपये आणि मोठ्यांसाठी ७० रुपये शुल्क आकारून राजरोसपणे हा अवैध व्यवसाय सुरू होता. काही दिवसांपूर्वीच स्थानिक लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत या स्विमिंग पूलचे मोठ्या थाटामाटात उद्घाटन करण्यात आले होते. नगरपरिषद प्रशासनाच्या डोळ्यादेखत हा अवैध व्यवसाय सुरू असल्याने आणि मुख्याधिकाऱ्यांनी वेळीच कारवाई न केल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. या दुर्घटनेला जबाबदार असणाऱ्या नगरपरिषद प्रशासनातील दोषी अधिकाऱ्यांवरही तात्काळ कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

COMMENTS