नवी दिल्ली : देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आशियाई दौर्यावर रवाना झाले असून ते व्हिएतनाम आणि दक्षिण कोरिया या देशांना भेटी देणार आहेत.या दौर्

नवी दिल्ली : देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आशियाई दौर्यावर रवाना झाले असून ते व्हिएतनाम आणि दक्षिण कोरिया या देशांना भेटी देणार आहेत.या दौर्याच्या माध्यमातून भारताचे दोन्ही देशांशी असलेले संरक्षण, सागरी आणि सामरिक संबंध अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. विशेषतः इंडो-पॅसिफिक क्षेत्रात शांतता, स्थैर्य आणि परस्पर सहकार्य वाढवण्यावर या दौर्यात भर दिला जाणार असल्याचे संरक्षण मंत्रालयाकडून सांगण्यात आले.
संरक्षण मंत्री 18 ते 19 मेदरम्यान व्हिएतनाममध्ये विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार असून त्यानंतर 19 ते 21 मे या कालावधीत दक्षिण कोरियाचा दौरा करणार आहेत. या भेटीदरम्यान संरक्षण क्षेत्रातील सहकार्य, लष्करी देवाणघेवाण, संरक्षण उत्पादन उद्योगातील भागीदारी तसेच सागरी सुरक्षेच्या विषयांवर सविस्तर चर्चा होणार आहे. व्हिएतनाम दौर्याला यंदा विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. भारत आणि व्हिएतनाम यांच्यातील सर्वसमावेशक सामरिक भागीदारीला दहा वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर हा दौरा होत आहे. अलीकडेच व्हिएतनामच्या राष्ट्राध्यक्षांनी भारत भेट दिली होती. त्या वेळी दोन्ही देशांनी परस्पर संबंध अधिक व्यापक आणि उच्च पातळीवर नेण्याचा निर्धार व्यक्त केला होता.

COMMENTS