Homeताज्या बातम्याअहमदनगर

सायली पाटीलचा आ. काळेंकडून सन्मान 

कोपरगाव प्रतिनिधी : दहावीच्या परीक्षेत डॉ. सीएम मेहता कन्या विद्यालयाची विद्यार्थिनी सायली बाळकृष्ण पाटील हिने  ८८.६०% गुण मिळवत घवघवीत यश संपादन

Ahmednagar : भाजपाचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील कोरोना पॉझिटिव्ह | LOKNews24
नेवाशातील अल अमीन उर्दू हायस्कूलचा 100 टक्के निकाल
डॉ. आंबी ‘महा ऍक्युपंक्चर रत्न’ पुरस्काराने सन्मानित

कोपरगाव प्रतिनिधी : दहावीच्या परीक्षेत डॉ. सीएम मेहता कन्या विद्यालयाची विद्यार्थिनी सायली बाळकृष्ण पाटील हिने  ८८.६०% गुण मिळवत घवघवीत यश संपादन केले. कोपरगाव पंचायत समितीमध्ये कार्यरत असलेले बाळकृष्ण पाटील व कोपरगाव नगरपालिकेच्या समृद्धी शहर स्तर संघाच्या व्यवस्थापक हर्षा पाटील यांची ती कन्या आहे.तिचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कोपरगाव आयोजित गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळ्यात सुप्रसिद्ध हास्य कवी तथा १४ व्या कोकण मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष अशोक नायगावकर यांच्या उपस्थितीत आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते सन्मान चिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. याप्रसंगी तालुका गटशिक्षणाधिकारी शबाना शेख, ज्येष्ठ नेते कारभारी आगवन, भाऊसाहेब भाबड, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष चारुदत्त सिनगर आदी मान्यवर उपस्थित होते.

COMMENTS