Homeताज्या बातम्याकृषी

यानिक सिनरने पटकावले इटालियन ओपनचे विजेतेपद

रोम : इटलीच्या स्टार टेनिसपटू यानिक सिनर याने इटालियन खुल्या टेनिस स्पर्धेचे विजेतेपद पटकावत देशासाठी ऐतिहासिक क्षण निर्माण केला. रोम येथील फोरो

जामखेडमचे अडीच कोटींच्या कामांचे भूमिपूजन; नगरपरिषदेच्या वतीने महाराष्ट्रदिनी विकासकामांचा धडाका
यंदा 105 टक्के पाऊस बरसणार !
महाबळेश्‍वर येथील पर्यटन महोत्सव समन्वयातून यशस्वी करावा : पालकमंत्री


रोम : इटलीच्या स्टार टेनिसपटू यानिक सिनर याने इटालियन खुल्या टेनिस स्पर्धेचे विजेतेपद पटकावत देशासाठी ऐतिहासिक क्षण निर्माण केला. रोम येथील फोरो इटालिको मैदानावर झालेल्या अंतिम सामन्यात त्याने नॉर्वेच्या उरीशिी र्र्ठीीव याचा 6-4, 6-4 अशा सरळ सेटमध्ये पराभव केला.
या विजयामुळे तब्बल 50 वर्षांनंतर इटलीच्या पुरुष खेळाडूने ही प्रतिष्ठेची स्पर्धा जिंकण्याचा मान मिळवला. यापूर्वी 1976 मध्ये एड्रियानो पानाटा यांनी हा किताब जिंकला होता. त्यामुळे सिनरच्या विजयाला इटालियन क्रीडाविश्‍वात विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या सिनरने या स्पर्धेद्वारे आणखी एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला. टेनिसमधील सर्व नऊ ‘मास्टर्स 1000’ स्पर्धा जिंकणारा तो नोव्हाक जोकोविच याच्यानंतरचा दुसरा खेळाडू ठरला. जोकोविचने 2018 मध्ये हा पराक्रम साधला होता. अवघ्या 24 व्या वर्षी सिनरने ही कामगिरी करून आपल्या सातत्यपूर्ण प्रगतीची छाप उमटवली आहे. सिनरचा सध्याचा फॉर्म अत्यंत प्रभावी मानला जात आहे. त्याने सलग 29 वा सामना जिंकत यंदाच्या मातीच्या कोर्टवरील स्पर्धांमध्ये अपराजित राहण्याची मालिका कायम ठेवली. या प्रकारच्या कोर्टवरील त्याचा यंदाचा विक्रम 17 विजय आणि शून्य पराभव असा झाला आहे. फेब्रुवारी महिन्यात कतार खुल्या स्पर्धेत त्याचा शेवटचा पराभव झाला होता. आता पुढील आठवड्यात सुरू होणार्‍या फ्रेंच खुल्या स्पर्धेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पॅरिसमधील रोलाँ गॅरो ही स्पर्धा सिनरने अद्याप जिंकलेली नाही. त्यामुळे या वेळी तो विजेतेपदाचा प्रमुख दावेदार मानला जात आहे. अंतिम सामन्यावेळी रोममधील मध्यवर्ती मैदान पूर्णपणे सिनरच्या समर्थकांनी भरून गेले होते. त्याच्या आवडीच्या केशरी रंगाचे पोशाख परिधान करून चाहत्यांनी मोठ्या उत्साहात त्याला पाठिंबा दिला. संपूर्ण सामन्यात सिनर, सिनर अशा घोषणांनी वातावरण दणाणून गेले होते. इटलीचे राष्ट्राध्यक्ष डशीसळे चरीींंरीशश्रश्रर हे देखील सामना पाहण्यासाठी उपस्थित होते. विजयानंतर भावना व्यक्त करताना सिनर म्हणाला, पन्नास वर्षांनंतर ही मानाची करंडक स्पर्धा पुन्हा इटलीत आली आहे. हा क्षण माझ्यासाठी आणि संपूर्ण देशासाठी अत्यंत विशेष आहे. दोन वेळा फ्रेंच खुल्या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचलेल्या रुडने सामन्याची सुरुवात दमदार केली होती. सुरुवातीला त्याने आघाडीही घेतली; मात्र सिनरने शांत आणि आक्रमक खेळ करत सामन्यावर पकड मजबूत केली. दुसर्‍या सेटमध्ये त्याने मारलेल्या जोरदार उलट फटक्यामुळे निर्णायक आघाडी मिळाली. रुडविरुद्धच्या कारकिर्दीतील त्याचा विक्रम आता 5-0 असा झाला आहे.

COMMENTS