Homeताज्या बातम्या

अमेरिकेच्या हल्ल्यांना इराणकडूनही प्रत्युत्तरक्षेपणास्त्र हल्ल्यानंतर पश्‍चिम आशिया पुन्हा अस्थिर

तेहरान/वॉशिंग्टन : पश्‍चिम आशियातील तणाव बुधवारी आणखी वाढला असून अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्ष नव्या टप्प्यावर पोहोचल्याचे चित्र दिसत आहे. अ

टेक्सासमध्ये भारतीय ध्वजाचा अवमान करत ‘इमिग्रेशन’ विरोधात निदर्शने; स्थानिक नागरिकाच्या संतापजनक कृत्याचा व्हिडिओ व्हायरल
फिलिपिन्समध्ये 7.8 तीव्रतेचा भूकंप
होर्मुझजवळ अमेरिकेचे युद्ध हेलिकॉप्टर कोसळले


तेहरान/वॉशिंग्टन : पश्‍चिम आशियातील तणाव बुधवारी आणखी वाढला असून अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्ष नव्या टप्प्यावर पोहोचल्याचे चित्र दिसत आहे. अमेरिकेने इराणमधील काही लष्करी लक्ष्यांवर हवाई हल्ले केल्याचा दावा केला आहे, तर त्याला प्रत्युत्तर म्हणून इराणने प्रदेशातील अमेरिकी तळांना लक्ष्य केल्याचे म्हटले आहे. या घडामोडींमुळे संपूर्ण आखाती प्रदेशात युद्धसदृश वातावरण निर्माण झाले आहे.
अमेरिकेच्या मध्यवर्ती लष्करी कमांडने दिलेल्या माहितीनुसार, होर्मुझ सामुद्रधुनी परिसरात अमेरिकेचे अपाचे हेलिकॉप्टर कोसळल्यानंतर इराणविरोधात कारवाई करण्यात आली. अमेरिकी प्रशासनाचा आरोप आहे की हेलिकॉप्टर इराणने पाडले होते. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या घटनेचा उल्लेख करत अमेरिकेला प्रत्युत्तर देणे अपरिहार्य असल्याचे सांगितले. मात्र, हेलिकॉप्टर कोसळण्यामागील कारणांबाबत वेगवेगळे दावे समोर येत आहेत. काही अमेरिकी अधिकार्‍यांच्या मते, अपाचे हेलिकॉप्टर एका मानवरहित विमानाला धडकल्यानंतर समुद्रात कोसळले असावे. या घटनेची चौकशी सुरू असून अंतिम अहवाल अद्याप आलेला नाही. हेलिकॉप्टरमधील दोन्ही वैमानिक सुरक्षित बचावले आहेत. अमेरिकेने इराणमधील हवाई संरक्षण यंत्रणा, नियंत्रण केंद्रे आणि रडार केंद्रांवर अचूक हल्ले केल्याचा दावा केला आहे. या कारवाईत हवाई दल आणि नौदलाच्या लढाऊ विमानांचा वापर करण्यात आल्याचे सांगण्यात आले. अमेरिकी अधिकार्‍यांच्या मते, ही कारवाई केवळ संरक्षणात्मक स्वरूपाची होती. अमेरिकेने प्रदेशातील आपल्या सैन्यावर तसेच व्यापारी जहाजांवर झालेल्या हल्ल्यांचाही उल्लेख करत इराणवर गंभीर आरोप केले आहेत. दरम्यान, अमेरिकी लष्कराने सध्या आपली प्रत्युत्तरात्मक कारवाई पूर्ण झाल्याचे जाहीर केले आहे.
इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी अमेरिकेच्या कारवाईचा निषेध करत कोणत्याही हल्ल्याला कठोर उत्तर दिले जाईल, असा इशारा दिला आहे. इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सने अमेरिकेच्या विविध लष्करी तळांवर हल्ले केल्याचा दावा केला आहे. इराणच्या म्हणण्यानुसार, बहरीनमधील अमेरिकेच्या पाचव्या नौदल ताफ्यावर मानवरहित विमानांद्वारे हल्ला करण्यात आला. तसेच जॉर्डनमधील काही अमेरिकी तळांनाही लक्ष्य करण्यात आले. अमेरिकेकडून या सर्व दाव्यांची अधिकृत पुष्टी झालेली नाही. रिव्होल्युशनरी गार्डने इशारा दिला आहे की, अमेरिकेने पुन्हा हल्ले केल्यास त्यापेक्षा अधिक व्यापक आणि तीव्र कारवाई केली जाईल. प्रदेशातील निश्‍चित लक्ष्यांवर मोठ्या प्रमाणात प्रहार करण्याची तयारी असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.इराणने अमेरिकेचे एक अत्याधुनिक मानवरहित विमान पाडल्याचा दावा केला आहे. दक्षिण इराणमधील जाम परिसरात ही कारवाई झाल्याचे तेहरानचे म्हणणे आहे. या घटनेची दृश्यफीत समाजमाध्यमांवर प्रसारित झाली असली तरी अमेरिकेने अद्याप त्याबाबत कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.
तेल बाजारावर जागतिक परिणाम
अमेरिका-इराण संघर्षाचा परिणाम जागतिक तेल बाजारावर दिसून आला आहे. होर्मुझ सामुद्रधुनी हा जगातील महत्त्वाचा तेल वाहतूक मार्ग मानला जातो. या परिसरातील अस्थिरतेमुळे कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाली आहे. व्यापार्‍यांमध्ये पुरवठा साखळी विस्कळीत होण्याची भीती निर्माण झाली असून आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या दरात जवळपास एक टक्का वाढ नोंदविण्यात आली आहे. अमेरिकेने आपली कारवाई पूर्ण झाल्याचे सांगितले असले तरी इराणकडून सतत प्रतिहल्ल्यांचे संकेत दिले जात आहेत. इस्रायल, लेबनॉन, बहरीन, जॉर्डन आणि आखाती प्रदेशातील इतर देशही या संघर्षाच्या छायेत आले आहेत.

COMMENTS