Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दीपक शिंदे यांचा श्रीगोंद्यात सत्कार

श्रीगोंदा : श्रीगोंद्याचे सुपुत्र दीपक शिंदे यांची पूर्व केमटेक प्रायव्हेट लिमिटेड या नामांकित कंपनीत नाशिक जिल्हा डिव्हिजनल मॅनेजरपदी नियुक्ती झ

समता इंटरनॅशनल स्कूलचे दहावीच्या परीक्षेत यश 
लॉर्ड महावीर इंग्लिश स्कूलचा 100% निकाल; 10 वी सीबीएसई परीक्षेत विद्यार्थ्यांची गौरवशाली कामगिरी
जि.प.के. प्रा. शाळा वांगीच्या मुख्याध्यापकांची कन्या साक्षी वीर एमबीबीएस पदवीधर; परिश्रम आणि जिद्दीची प्रेरणादायी कहाणी

श्रीगोंदा : श्रीगोंद्याचे सुपुत्र दीपक शिंदे यांची पूर्व केमटेक प्रायव्हेट लिमिटेड या नामांकित कंपनीत नाशिक जिल्हा डिव्हिजनल मॅनेजरपदी नियुक्ती झाल्याबद्दल श्रीगोंदा तालुक्यात त्यांचा सत्कार करण्यात आला. या नियुक्तीमुळे कृषी क्षेत्रातील व्यवसायात त्यांचे नेतृत्व अधिक बळकट होणार असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
श्रीगोंदा तालुका सीड्स, पेस्टिसाईड्स अँड फर्टीलायझर्स असोसिएशनच्या वतीने आयोजित कार्यक्रमात अध्यक्ष किशोर भोस, नगरसेवक महावीर पटवा, सुरेश रणवरे तसेच महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष माधव बनसुडे यांनी शिंदे यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी शिंदे यांच्या कार्यकौशल्याचे कौतुक करत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
  दीपक शिंदे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे, कीटकनाशके व खतांची उपलब्धता करून देत कृषी विकासाला हातभार लावण्याचा आपला प्रयत्न राहील. तसेच शेतकऱ्यांशी समन्वय साधून आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रसार करण्यावर भर दिला जाईल, असेही त्यांनी नमूद केले. या कार्यक्रमाला असोसिएशनचे पदाधिकारी, व्यापारी व स्थानिक नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचा शेवट आभार प्रदर्शनाने झाला.

COMMENTS