Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

 बेलापूरमध्ये संतसंग उद्घाटन समारंभ उत्साहात

अकोले : तालुक्यातील बेलापूर येथे जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी संप्रदायामार्फत नवीन संतसंग उद्घाटन समारंभ रविवारी (दि. १२ एप्रिल २०२६) उ

अकोलेत युरियाचा ३३५ टन बफर साठा उपलब्धग्राहक पंचायतच्या पाठपुराव्याला यश; ५१ कृषी सेवा केंद्रांवर वितरण सुरू
भाजप कार्यकर्त्यांनी रोजगार निर्मितीकडेही लक्ष द्यावे;प्रदीप पेसकर ; ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान’ उत्साहात
शेतकरी समस्यांच्या पार्श्वभूमीवर दोन दिवसीय बैठक उत्साहात

अकोले : तालुक्यातील बेलापूर येथे जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी संप्रदायामार्फत नवीन संतसंग उद्घाटन समारंभ रविवारी (दि. १२ एप्रिल २०२६) उत्साहात पार पडला. आरतीचे रूपांतर संतसंगात करत हा सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या निमित्ताने जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली. आकर्षक रथातून काढण्यात आलेल्या या शोभायात्रेत पारंपरिक वाद्यांचा गजर, कलशधारी महिला, लेझीम पथक, निशाणधारी महिला-पुरुष तसेच भजनी मंडळाचा उत्स्फूर्त सहभाग होता. बेलापूर येथील गुरुबंधू यजमान यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
या वेळी वेदपाठ शाळेतील पुरोहित श्रीनिवास बोगाडे गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली पूजन विधी पार पडला. तसेच मुलींच्या वेदपाठशाळेतील प्रशिक्षणार्थी महिला पुरोहित रोहिणी येवले, ईश्वरी पालकर व ईश्वरी गाडेकर यांनीही विधीत सहभाग घेतला. कार्यक्रमास अकोले तालुका सेवा समिती तसेच उत्तर अहिल्यानगर जिल्हा सेवा समितीचे सदस्य उपस्थित होते.
याप्रसंगी प्रवचनकार जागृतीताई दरणे यांनी सुश्राव्य प्रवचन केले. प्रशिक्षणार्थी प्रवचनकार दीपक तांबे यांच्या माध्यमातून आरतीचे संतसंगात रूपांतर करण्यात आले. कार्यक्रमासाठी भाविकांची मोठी उपस्थिती होती. प्रवचनानंतर सर्वांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.

COMMENTS