Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राष्ट्रवादीकडे नैतिकता असेल तर जागा ताब्यात द्यावी : जितेंद्र पाटील

इस्लामपूर / प्रतिनिधी : राष्ट्रवादी कार्यालयाची जागा काँग्रेस कमिटीच्या नावावर आहे. तसा सिटी सर्व्हेचा उतारा निघत आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँ

बेपत्ता झालेले पोलिस निरीक्षक संग्राम ताडे शिरवळमध्ये बेशुध्द अवस्थेत
शंभर हुन अधिक महिलांच्या सहभागाने लोणंद येथे दुचाकी रॅली ; रॅलीतून दिला महिला सक्षमीकरणाचा संदेश
तामकणेच्या नाथ मंदीराच्या कामासाठी मदतीचे आवाहन

इस्लामपूर / प्रतिनिधी : राष्ट्रवादी कार्यालयाची जागा काँग्रेस कमिटीच्या नावावर आहे. तसा सिटी सर्व्हेचा उतारा निघत आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे नैतिकता असेल तर राष्ट्रवादी कार्यालयाच्या जागेचा ताबा काँग्रेस कमिटीच्या ताब्यात द्यावा, अशी मागणी वाळवा तालुका काँग्रेस अध्यक्ष जितेंद्र पाटील यांनी पत्रकार बैठकीत केली. यावेळी राज्य अल्पसंख्याक प्रदेश उपाध्यक्ष शाकीर तांबोळी, युवक काँग्रेस प्रदेश सचिव विजय पवार, खरातवाडीचे उपसरपंच अर्जुन खरात यांची प्रमुख उपस्थिती होती.
पाटील म्हणाले, जिल्ह्यातील प्रत्येक तालुका ठिकाणी एक काँग्रेस भवन काढावे असे लेखी पत्र काँग्रेस कमिटी दिल्लीचे अध्यक्ष यु. एन. देवर यांनी प्रत्येक जिल्ह्यात दि. 27 फेब्रुवारी 1954 साली पाठवले होते. यावर तत्कालीन वाळवा तालुका अध्यक्ष शंकर बाबूराव पाटील व चिटणीस यशवंतराव मोरे यांनी काँग्रेस भवनसाठी जागा मिळावी. म्हणून दक्षिण सातारा-सांगली जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी केली होती. त्यानंतर तत्कालीन तालुकाध्यक्ष मोहन पतंगराव पाटील यांनी अधिकची जागा शासनाकडून 1660 रूपये भरून 55 बाय 65 चौरस मीटर जागा शासनाकडून मिळवून 7 ऑक्टोंबर 1959 रोजी बांधकाम केले. सिटी सर्व्हेला 26 ऑगस्ट 1961 रोजी प्रेसिडेंट तालुका काँग्रेस कमिटी वाळवा अशी नोंद झाली व ती आजही कायम आहे.
राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष याच तालुक्यातील आहेत. ते राज्यातील ज्येष्ठ नेते आहेत. महाविकास आघाडी म्हणून आमच्या मागणीचा ते नक्की विचार करतील. यासाठी आम्ही त्यांच्याशी चर्चा करू असे तालुकाध्यक्ष जितेंद्र पाटील यांनी सांगितले.
शाकिर तांबोळी म्हणाले, विटा, तासगाव, इस्लामपूर येथे एकाच वेळी काँग्रेस भवनसाठी मंजूरी मिळाली होती. त्यातील तासगावची जागा काँग्रेसने ताब्यात घेतली आहे. त्याच धर्तीवर इस्लामपूरची जागा कायदेशीर कागदोपत्री काँग्रेस कमिटीच्या नावाने असल्याने ही जागा आम्हाला मिळावी.
विजय पवार म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी या इमारतीचा नगरपालिका कर वाळवा तालुका काँग्रेस कमिटीच्या नावानेच भरत आहेत. त्यांना काही शंका असल्यास कागदोपत्री पुरावे आम्ही सादर करू. त्यांनी ही इमारत काँग्रेसच्या ताब्यात द्यावी.

COMMENTS