Homeताज्या बातम्याअन्य जिल्हे

खासदारांचा फोन जाताच गुत्तेदार लाईनवर; रखडलेला रस्ताचे काम सुरू

गेल्या सहा महिन्यांपासून संथ गतीने काम झालेला व रखडलेला रस्त्यामुळे त्रस्त झालेल्या तालुक्यातील पिंपळगांव महादेव येथील ग्रामस्थांच्या संयमाचा अखे

ओंकार गायकवाड मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करा : घोगरे 
कोपरगावमध्ये मध्यरात्री गुंडांचा हैदोसधारदार शस्त्रे, दांडक्यांसह तरुणांचा ‘राडा’; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
पुरुषोत्तम  पुरी यात्रेत भीषण बोट दुर्घटना!दोन महिला भाविकांचा मृत्यू,अनेक जखमी; ट्रस्ट व प्रशासनाच्या नियोजनावर संताप



गेल्या सहा महिन्यांपासून संथ गतीने काम झालेला व रखडलेला रस्त्यामुळे त्रस्त झालेल्या तालुक्यातील पिंपळगांव महादेव येथील ग्रामस्थांच्या संयमाचा अखेर बांध सुटला. लग्नसराईत गावकर्‍यांना आणि पाहुण्यांना मोठी कसरत करावी लागली तर इतकेच नव्हे तर एका निष्पाप बालकाला गंभीर दुखापतही झाली. मात्र ढिम्म प्रशासनाला जाग येत नसल्याचे पाहून गावकर्‍यांनी थेट वरून सुत्रे हलवली. खासदार तथा माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या दरबारात तक्रार पोहोचताच दुसर्‍याच मिनिटाला चक्र फिरली आणि रडतखडतलेल्या रस्त्याचे काम सायंकाळी सुरूवात झाली.
पिंपळगांव महादेव येथील मुख्य रस्त्याचे काम गेल्या सहा महिन्यांपासून अत्यंत संथ गतीने चालू होते. संबंधित गुत्तेदाराने रस्त्यावर गिट्टी टाकलेली काम रखडल्याने ती तशीच उघडी सोडून दिली होती. त्यामुळे संपूर्ण रस्त्याची चाळण झाली असून वाहनचालकांना अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागत होती. सध्या लग्नसराईचे दिवस असल्याने गावात पाहुण्यांची मोठी वर्दळ होती. गावकर्‍यांनी गुत्तेदाराला हात जोडून विनंती केली बाबा रे लग्नकार्य आहेत रस्ता नीट कर. पण गुत्तेदाराने याकडे साफ दुर्लक्ष केले. गुत्तेदाराच्या या मनमानीचा फटका एका पाहुण्या कुटुंबाला बसला. गावात लग्नसोहळ्यासाठी आलेल्या एका पाहुण्यांची दुचाकी या उखडलेल्या गिट्टीवरून घसरली. या भीषण अपघातात एक निष्पाप बालक गंभीर जखमी झाला. या घटनेमुळे पिंपळगांवच्या ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली. अखेर आता विनंत्या पुरे थेट कारवाई हवी असा पवित्रा गावकर्‍यांनी घेतला.  ग्रामस्थांनी थेट खासदार अशोकराव चव्हाण यांची भेट घेतली. त्यांनी गुत्तेदाराच्या कारभाराचा पाढाच चव्हाणांसमोर वाचला. खासदारांनी प्रकरणाचे गांभीर्य ओळखून तात्काळ संबंधित यंत्रणेला आणि गुत्तेदाराला कडक शब्दांत सुनावले. असता ज्या रस्त्याकडे गुत्तेदार ढुंकूनही पाहत नव्हता त्याच रस्त्यावर त्याच दिवशी सायंकाळी डांबर, खडी आणि मजुरांचा ताफा हजर झाला आणि काम युद्धपातळीवर सुरू झाले.

COMMENTS