Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

काँगे्रसची माघार, ठाकरेंची अखेर सरशी; विधानपरिषद निवडणुकीसाठी 10 अर्ज दाखल; शिवसेनेकडून बच्चू कडू, डॉ. गोर्‍हे यांना संधी

मुंबई : विधानपरिषदेच्या 10 जागांसाठी गुरूवारी अखेरच्या दिवशी भाजपच्या 6 तर, शिंदे यांच्या शिवसेनेकडून 2 राष्ट्रवादी काँगे्रसकडून 1 आणि महाविकास आ

मिसिंग लिंकचे शिल्पकार डॉ. अनिलकुमार गायकवाड यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव
सुनेत्रा पवारांचा देशात सर्वाधिक मताधिक्यचा विक्रम
बारामती, राहुरीत प्रचाराची सांगता; अजितदादांच्या अपघाताची निष्पक्ष चौकशी व्हावी : सुनेत्रा पवार

मुंबई : विधानपरिषदेच्या 10 जागांसाठी गुरूवारी अखेरच्या दिवशी भाजपच्या 6 तर, शिंदे यांच्या शिवसेनेकडून 2 राष्ट्रवादी काँगे्रसकडून 1 आणि महाविकास आघाडीकडून ठाकरे यांच्या शिवसेनेच्या 1 उमेदवाराने अर्ज दाखल केले आहेत. 10 जागांसाठी 10 अर्ज दाखल झाल्याने ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. मात्र उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यपूर्ण घडामोडी घडल्या. महाविकास आघाडीमध्ये ठाकरे गटाचे उमेदवार अंबादास दानवे यांच्या उमेदवारीला शेवटच्या क्षणी काँगे्रसने पाठिंबा देत माघार घेतली.
शिंदे यांच्या शिवसेनेने बच्चू कडू आणि डॉ. नीलम गोर्‍हे यांना संधी दिली. बच्चू कडू यांनी थेट शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे शिंदेंची ताकद वाढणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडून झिशान सिद्दीकी यांनी अर्ज दाखल केला आहे. तसेच भाजपने यापूर्वीच आपले सहा उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. महाविकास आघाडीने गुरूवारी संयुक्तपणे घेतलेल्या पत्रकार परिषदेत अंबादास दानवे हेच महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार असल्याची घोषणा केली. या वेळी आघाडीतील प्रमुख नेत्यांनी एकत्र येत निवडणूक एकजुटीने लढवण्याचा निर्धार व्यक्त केला. शिवसेना (ठाकरे गट) नेत्या प्रियंका चतुर्वेदी यांनी उद्धव ठाकरे यांच्या निर्णयाचे कौतुक केले आहे. स्वतः उमेदवारी न देता अंबादास दानवे यांना संधी देणे हे नेतृत्वाचे मोठेपण असल्याचे त्यांनी नमूद केले. योग्य वेळी इतरांना संधी देण्याची परंपरा कायम ठेवली असल्याचेही त्यांनी सांगितले. निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर आरोप-प्रत्यारोपांनाही सुरुवात झाली आहे. शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरे यांच्या निर्णयावर टीका करत पराभवाच्या भीतीमुळे त्यांनी निवडणुकीपासून दूर राहिल्याचा आरोप केला. या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण आणखी तापले आहे. बच्चू कडू यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करत आपल्या राजकीय वाटचालीला नवे वळण दिले. शेतकरी, दिव्यांग आणि सर्वसामान्यांच्या प्रश्‍नांसाठी अधिक प्रभावीपणे लढा देण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यांनी सांगितले की, सामाजिक कार्यासाठी ‘प्रहार’ संघटना कार्यरत राहील, तर राजकीय स्तरावर शिवसेनेला बळकटी देण्यावर भर दिला जाईल.

निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता
विधान परिषदेच्या 10 जागांसाठी 10 उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. मात्र उमेदवारी निश्‍चिती आणि अर्ज प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता अर्ज छाननीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यानंतरच पुढील राजकीच वित्र स्पष्ट होणार आहे.

COMMENTS