Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुण्यात रासायनिक कारखान्यात वायूगळती; 24 जण रुग्णालयात, वेळीच नियंत्रणामुळे जीवितहानी टळली

पुणे : शहरातील बिबवेवाडी परिसरात गुरुवारी मध्यरात्री एका रासायनिक कारखान्यात झालेल्या वायूगळतीच्या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली. या घटनेत 22 नागरिक आ

पुण्यातील केमिकल कंपनीत भीषण गॅस गळती; २४ नागरिकांना श्वसनाचा त्रास, अग्निशमन दलाचे जवानही बाधित!
ठाण्यात शिवशाही बस जळून खाक;15 प्रवासी थोडक्यात बचावले, प्रवाशांत भीतीचे वातावरण
उरणमधील गव्हाण फाटा येथील गोदामाला भीषण आग; अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल
Pune Chemical Gas Leak: पुण्यातील केमिकल कंपनीत गॅस गळती, 24 नागरिकांसह  बचावकार्यासाठी गेलेल्या अग्निशमन दलाच्या अधिकारी अन् जवानाला श्वसनाचा त्रास  ...

पुणे : शहरातील बिबवेवाडी परिसरात गुरुवारी मध्यरात्री एका रासायनिक कारखान्यात झालेल्या वायूगळतीच्या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली. या घटनेत 22 नागरिक आणि अग्निशमन दलाचे दोन जवान अशा एकूण 24 जणांना श्‍वसनाचा त्रास झाल्याने विविध रुग्णालयांत दाखल करण्यात आले. मात्र अग्निशमन दलाच्या तातडीच्या कारवाईमुळे मोठा अनर्थ टळल्याचे स्पष्ट झाले आहे.
गंगाधाम चौकाजवळील आईमाता मंदिर परिसरात असलेल्या एका रासायनिक प्रक्रिया करणार्‍या कारखान्यात बुधवारी मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास एका साठवण टाकीतून मोठ्या प्रमाणावर वायू बाहेर पडू लागला. या वायूचा तीव्र वास परिसरात वेगाने पसरल्याने झोपेत असलेल्या नागरिकांना डोळ्यांत जळजळ, घसा कोरडा पडणे आणि श्‍वास घेण्यास त्रास होऊ लागला. परिस्थिती गंभीर होत असल्याचे लक्षात येताच नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे प्रमुख अधिकारी देवेंद्र पोटफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी व जवानांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून जवानांनी श्‍वसन संरक्षण साधने परिधान करून कारखान्यात प्रवेश केला. विशेष वाहनांसह अग्निशमन दलाने चार गाड्यांच्या सहाय्याने वायूगळती रोखण्यासाठी प्रयत्न सुरू केले. बचावकार्यादरम्यान अनेक नागरिकांना श्‍वसनाचा तीव्र त्रास होत असल्याचे आढळले. तातडीने रुग्णवाहिकांच्या मदतीने बाधितांना ससून तसेच इतर रुग्णालयांत हलवण्यात आले. बचावकार्य करताना दोन जवानांनाही वायूचा परिणाम झाल्याने त्यांनाही उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेत लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत अनेक जण बाधित झाले आहेत. काही कुटुंबांतील सदस्यांची संख्या अधिक असल्याचेही समोर आले. त्यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अग्निशमन दलाने अत्यंत धैर्याने आणि कौशल्याने केलेल्या प्रयत्नांमुळे वायूगळतीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.

COMMENTS