Homeताज्या बातम्यामुंबई - ठाणे

प.बंगालमध्ये काँगे्रस नेते अधीर रंजन यांना धक्काबुक्की; केरळमध्येही शशी थरूर यांच्या ताफ्याला अडवून गोंधळ

नवी दिल्ली : देशभरातील पाच राज्यांतील विधानसभा निवडणूक प्रचार रंगात आला असतांना पश्‍चिम बंगालमधील बहारामपूर येथे काँग्रेसचे उमेदवार अधीर रं

स्थापना दिवस समितीच्या संयोजकपदी ढोकरीकर
‘गरीब विद्यार्थी फंडा’त १९ लाखांची जमा; दादा पाटील महाविद्यालयाचा आदर्श उपक्रम
अचूक पंचनामे करून अहवाल सादर करा; पालकमंत्री विखेंकडून नुकसानीची पाहणी; प्रशासनास निर्देश

नवी दिल्ली : देशभरातील पाच राज्यांतील विधानसभा निवडणूक प्रचार रंगात आला असतांना पश्‍चिम बंगालमधील बहारामपूर येथे काँग्रेसचे उमेदवार अधीर रंजन चौधरी यांना प्रचारावेळी विरोधांकडून धक्काबुक्की करण्यात आली. वॉर्ड क्रमांक 19 मध्ये ते समर्थकांसह भेटीगाठी घेत असताना काही स्थानिक कार्यकर्त्यांनी त्यांना घेरल्याचा आरोप आहे. या वेळी झालेल्या गोंधळात धक्काबुक्की झाल्याचे दृश्य समोर आले आहे. काँग्रेसने या प्रकारासाठी सत्ताधारी तृणमूल काँग्रेसच्या स्थानिक नेतृत्वावर बोट ठेवले असून, हा प्रकार पूर्वनियोजित असल्याचा आरोप केला आहे.
केरळमध्येही प्रचाराच्या पार्श्‍वभूमीवर तणावाची घटना घडली. काँग्रेस खासदार शशी थरूर यांच्या ताफ्याला काही व्यक्तींनी अडवून गोंधळ घातल्याची माहिती समोर आली आहे. मल्लापुरम जिल्ह्यातील वंदूर परिसरात सायंकाळी ही घटना घडली. ताफा रोखण्याचा प्रयत्न करताना थरूर यांच्या चालक आणि अंगरक्षकावर हल्ला करण्यात आल्याचे सांगितले जाते. पोलिसांनी या प्रकरणात एका संशयिताला ताब्यात घेतले असून हल्ल्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. थरूर मात्र या घटनेत सुरक्षित असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. या घटनांमुळे निवडणूक प्रक्रियेतील सुरक्षिततेचा प्रश्‍न पुन्हा ऐरणीवर आला आहे. राजकीय मतभेद असले तरी त्याचे रूपांतर हिंसाचारात होणे ही लोकशाहीसाठी धोक्याची बाब असल्याची प्रतिक्रिया विविध स्तरांतून व्यक्त होत आहे. निवडणुकीशी संबंधित काही महत्त्वाच्या घडामोडीही समोर आल्या आहेत. केरळमध्ये तरुण मतदारांना मतदानासाठी प्रोत्साहन देण्यासाठी विशेष उपक्रम राबवला जाणार आहे. अठरा ते तीस वयोगटातील मतदारांना मतदान केंद्रापर्यंत मर्यादित अंतरासाठी मोफत प्रवासाची सुविधा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रथमच मतदान करणार्‍यांसाठी प्रोत्साहनपर भेटवस्तूही देण्यात येणार असल्याची माहिती आहे. तामिळनाडूमध्ये निवडणूक पथकाने मोठी रोख रक्कम जप्त केल्याने खळबळ उडाली आहे.

COMMENTS