Homeताज्या बातम्या

अंजनवती येथील तरुणाच्या संशयास्पद मृत्यूची निष्पक्ष चौकशी करा; नितीन सोनवणे यांची मागणी

बीड : तालुक्यातील अंजनवती येथील किरण बंडू सोनावणे यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना समोर आली असून, या प्रकरणाची निष्पक्ष आणि सखोल चौकशी करण्या

22 लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात पेपर लीक प्रकरणात सीबीआय चौकशी करा- नितीन सोनवणेभारत सरकारचे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या
तांदळवाडी घाट ग्रामपंचायतीतील कथित गैरव्यवहाराची वरिष्ठ पातळीवर पुनर्चौकशी करा-नितीन सोनवणे पालकमंत्र्यांकडे तक्रार; दोषींवर फौजदारी कारवाईची मागणी
पत्रकारांना शिवीगाळ व धमकी प्रकरणी खा. संजय दिना पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करा; अन्यथा राज्यव्यापी आंदोलन – नितीन सोनवणेपत्रकारांवर हात उठवला तर पँथर स्टाईल उत्तर देऊ – ऑल इंडिया पँथर सेनेचा इशारा
Nitin Sonwane (@nitin.sonawane.681748) • Facebook

बीड : तालुक्यातील अंजनवती येथील किरण बंडू सोनावणे यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना समोर आली असून, या प्रकरणाची निष्पक्ष आणि सखोल चौकशी करण्याची मागणी जोर धरत आहे. लिंबागणेश-अंजनवती मार्गावरील गणेशमाळ परिसरात किरण सोनावणे यांचा मृतदेह आढळून आला. मृतदेहाजवळ MH १६ AH २६६१ क्रमांकाची दुचाकी केवळ खाली पडलेल्या अवस्थेत आढळली. वाहनाचे कोणतेही गंभीर नुकसान झाले नसल्याने या मृत्यूबाबत संशय व्यक्त केला जात आहे.

प्राथमिक माहितीनुसार, ही घटना अपघात नसून गळा दाबून खून झाल्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे या प्रकरणाचा सर्वंकष तपास करून सत्य बाहेर आणावे, अशी मागणी ऑल इंडिया पँथर सेना सामाजिक संघटनेकडून करण्यात आली आहे. संघटनेने प्रशासनाकडे या प्रकरणात तातडीने भादंवि कलम ३०२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

तसेच घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी, संशयितांची चौकशी, इन-कॅमेरा पोस्टमार्टम आणि पुरावे जतन करून दोषींना तातडीने अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे. ऑल इंडिया पँथर सेनेचे महाराष्ट्र प्रवक्ते तथा जिल्हाध्यक्ष नितीन सोनवणे यांनी सांगितले की, बीड जिल्हा पोलीस प्रशासनाने या प्रकरणाचा गांभीर्याने तपास करावा, अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन उभारण्यात येईल. दरम्यान, किरण सोनावणे यांच्या निधनाबद्दल परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

COMMENTS