Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शिरुर-हाळी रस्त्यावर वाहनाच्या धडकेत दोघे ठार

उदगीर प्रतिनिधी - तालुक्यातील हाळी हंडरगुळी - कामावरून घरी परत असताना शिरूर ताजबंद - हाळी राज्यमार्गावर दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने झाल

शिरवळ येथे महामार्गावर भीषण अपघात
बिहारमध्ये भीषण अपघात; 9 जणांचा जागीच मृत्यू
लग्नकार्यास निघालेल्या वऱ्हाडाच्या बसला अपघात, ७ ठार अनेक जखमी

उदगीर प्रतिनिधी – तालुक्यातील हाळी हंडरगुळी – कामावरून घरी परत असताना शिरूर ताजबंद – हाळी राज्यमार्गावर दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक जण जागेवर ठार तर दोघे जण जखमी झाल्याचीं घटना घडली आहे.जखमींपैकी एका जणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेमुळे हाळी हंडरगुळी गावात हळहळ व्यक्त होत आहे.
हाळी हंडरगुळी येथील तिघे तरूण अहमदपूर येथे कलर लावण्याच्या कामासाठी गेले होते. सायंकाळी काम आटोपून अहमदपूरहून हाळी हंडरगुळीकडे निघाले असता शिरूर ताजबंदच्या पुढे आले आल्यानंतर अज्ञात वाहनाने धडक दिली. त्यात दत्ता बब्रुवान गुडेवार रा.हंडरगुळी वय 21 वर्षे या तरूणाचा जागेवरच मृत्यू झाला तर अमित देवानंद गायकवाड रा.हाळी वय 24 वर्षे रा.हाळी याचा लातूर येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाला. रविवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे हाळी व हंडरगुळी या दोन्ही गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

COMMENTS