Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शिक्षक-विद्यार्थी हितासाठी गतिमान प्रशासनाचा संकल्प : उपशिक्षणाधिकारी धनंजय शिंदेमा.आ.अमरसिंह पंडित यांनी केला उपशिक्षणाधिकारी धनंजय शिंदे यांचा सत्कार

बीड : जिल्हा शिक्षण विभागात प्रशासन अधिक प्रभावी, पारदर्शक आणि गतिमान करण्याचा संकल्प नव्याने रुजू झालेले उपशिक्षणाधिकारी (मा.) धनंजय रामराव शिंद

जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढवण्यासाठी अनुभवी चेहरा म्हणून अमरसिंह पंडित यांना विधानपरिषदेची संधी द्यावी- शेख तय्यब
गेवराई विधानसभा मतदारसंघ पाणीदार करणे हेच माझे ध्येय-अमरसिंह पंडित;प्रकल्प जलशारदा अंतर्गत बंगाली पिंपळा आणि म्हांडुळा येथे नाला खोलीकरण व रुंदीकरणाचा शुभारंभ
अतिक्रमण धारकांना तात्काळ पीटीआर वाटप करून घरकुल योजनेचा लाभ द्या-आ.विजयसिंह पंडितअमरसिंह पंडित यांच्या उपस्थितीत पीटीआर प्रश्नावर बैठक

बीड : जिल्हा शिक्षण विभागात प्रशासन अधिक प्रभावी, पारदर्शक आणि गतिमान करण्याचा संकल्प नव्याने रुजू झालेले उपशिक्षणाधिकारी (मा.) धनंजय रामराव शिंदे यांनी व्यक्त केला आहे. दि. 4 मे रोजी त्यांनी पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर शिक्षक, विद्यार्थी आणि शाळांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देण्याचे स्पष्ट संकेत दिले.
शिक्षणाधिकारी (मा.) कार्यालयात तब्बल 14 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या शिंदे यांनी सांगितले की, शिक्षणाधिकारी प्रियाराणी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व कामकाज पारदर्शक, वेळेवर आणि परिणामकारक पद्धतीने राबविण्यात येईल. मुख्याध्यापक व शिक्षकांच्या प्रलंबित समस्या तातडीने सोडविण्यासाठी विशेष यंत्रणा उभारली जाईल. अनुदानित, अंशतः अनुदानित तसेच विनाअनुदानित व कायम विनाअनुदानित शाळांमधील शिक्षक-प्रश्न प्राधान्याने हाताळले जातील. सेवानिवृत्त शिक्षकांची वैद्यकीय बिले वेळेत मंजूर करून त्यांचा जलद निपटारा करण्यावरही भर दिला जाणार आहे. यासोबतच झिरो पेंडन्सी धोरण राबवून सर्व प्रकरणांचा वेळेत निपटारा करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. शिक्षण व्यवस्थेत सकारात्मक बदल घडविण्याच्या दिशेने शिंदे यांची ही भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे शिक्षण क्षेत्रातून व्यक्त होत आहे.
मा. आ. अमरसिंह पंडित यांनी केला उपशिक्षणाधिकारी धनंजय शिंदे यांचा सत्कार
उपशिक्षणाधिकारी म्हणून धनंजय शिंदे हे रुजू होताच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी त्यांचा सत्कार करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी बोलताना अमरसिंह पंडित यांनी  शिंदे यांच्या आतापर्यंतच्या कार्याचे तोंडभरून कौतुक केले. तसेच त्यांच्या नियुक्तीमुळे शिक्षण क्षेत्रात गुणवत्ता, पारदर्शकता आणि उत्तरदायित्व वाढण्यास चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

COMMENTS