चौरेच्या अपघाती मृत्यूच्या सखोल चौकशीची मागणी

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

चौरेच्या अपघाती मृत्यूच्या सखोल चौकशीची मागणी

उपमहापौर भोसलेंचे मनपा आयुक्तांना पत्र

अहमदनगर/प्रतिनिधी : सावेडीच्या प्रोफेसर कॉलनी चौक येथे विजेचा धक्का बसून झालेल्या दुर्घटनेची व यात झालेल्या सौरभ सुरेश चौरे (वय 22, रा. नालेगाव) या य

विवेकानंद प्री स्कूलमध्ये क्रीडा महोत्सवाचे आयोजन
ड्रोनद्वारे औषध फवारणीचे 24 मार्च रोजी प्रात्यक्षिक
काँग्रेस सोडणार्‍यांवर पायरीवर उभी राहायची वेळः थोरात

अहमदनगर/प्रतिनिधी : सावेडीच्या प्रोफेसर कॉलनी चौक येथे विजेचा धक्का बसून झालेल्या दुर्घटनेची व यात झालेल्या सौरभ सुरेश चौरे (वय 22, रा. नालेगाव) या युवकाच्या मृत्यूची सखोल चौकशी करण्याची मागणी उपमहापौर गणेश भोसले यांनी मनपा आयुक्त शंकर गोरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. तसेच चौरे याच्या कुटुंबियांना आर्थिक मदत मिळण्याचीही गरज त्यांनी या पत्रात व्यक्त केली आहे.
गुरुवार दिनांक 25 नोव्हेंबर रोजी प्रोफेसर कॉलनी चौक या ठिकाणी सौरभ सुरेश चौरे हा युवक फ्लेक्स बोर्ड लोखंडी कमानीला लावत असताना विजेचा धक्का बसून त्याचा दुर्दैवी मृत्यु झाला आहे.

या पार्श्‍वभूमीवर उपमहापौर भोसले यांनी या दुर्घटनेची व सौरभच्या मृत्यूची चौकशी करण्याची मागणी केली आहे. याबाबत आयुक्त गोरेंना दिलेल्या पत्रात भोसले यांनी म्हटले आहे की, नगर महापालिकेने शिरीष एन लोढा, पुणे या संस्थेला शहरामध्ये विविध ठिकाणी बी.ओ.टी. तत्वावर गॅन्ट्री (दिशादर्शक फलक) बसविण्याचे काम 10 वर्षाकरीता दिलेले आहे. या संस्थेने 21 ठिकाणांपैकी सध्या 4 ठिकाणी अशा कमानी उभारल्या आहेत. या कमानींवर या संस्थेला रस्त्याचे दिशादर्शक फलक व उत्पन्नासाठी जाहिरात फलक लावण्यास परवानगी दिलेली आहे. पण, शहरात उभारलेल्या कमानी या विद्युत पोल अथवा विद्युत तारांजवळ उभारताना दक्षता तसेच दुर्घटना घडणार नाहीत अशा सुरक्षित अंतरावर या कमानी उभारणे गरजेचे होते. प्रोफेसर कॉलनी या ठिकाणी उभारलेल्या कमानीजवळ विद्युत तारा आहेत. या विद्युत तारांमध्ये प्लॅस्टिकचा पाईप व सुरक्षा उपाययोजना करणे गरजेचे होते. याबाबत संबंधित संस्थेने ही काळजी न घेतल्यामुळे व हलगर्जीपणामुळे सौरभ चौरे या मुलाचा मृत्यु झालेला आहे. हा युवक कमी वयाचा असून या दुर्घटनेमुळे त्याच्या कुटुंबियांवर मोठा आघात झालेला आहे, असे स्पष्ट करून पुढे म्हटले आहे की, महापालिकेच्या अटी-शर्तीनुसार जाहिरात लावताना प्रशिक्षित मनुष्यबळाचा वापर करणे आवश्यक आहे. जेणेकरुन जीवितहानी होणार नाही तसेच जीवितहानी झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी या संस्थेची आहे.त्यामुळे सौरभ चौरे या मुलाच्या कुटूंबियांना महापालिकेने संबंधित संस्थेवर दंडात्मक कारवाई करुन व त्यांच्याकडून आर्थिक मदत मिळवून देणे आवश्यक आहे, असे उपमहापौर भोसले यांचे म्हणणे आहे. तसेच यापुढे शहरामध्ये लावण्यात आलेल्या गॅन्ट्रीमुळे (दिशादर्शक फलक) अशी दुर्घटना घडणार नाही याबाबत पाहणी करुन सुरक्षित उपाययोजना करण्यात याव्यात. त्यामुळे प्रोफेसर कॉलनी चौक येथे गॅन्ट्रीवर (दिशादर्शक फलक) फ्लेक्स बोर्ड लावताना विजेचा धक्का बसून झालेल्या दुर्घटनेची सखोल चौकशी करण्यात येवून संबंधित संस्थेवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी भोसलेंनी केली आहे.

COMMENTS