Homeताज्या बातम्या

झारखंडमध्ये पेपरफुटीविरोधात विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला सीजेपीचा पाठिंबा

झारखंड : झारखंडमधील विविध भरती परीक्षांमध्ये झालेल्या कथित गैरव्यवहाराविरोधात विद्यार्थ्यांचे सुरू असलेले आंदोलन अधिक तीव्र झाले आहे. १४ व्या झार

एसटीच्या स्मार्ट कार्डसाठी १ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ; गैरसोय टाळण्यासाठी परिवहन मंत्री सरनाईक यांचा निर्णय
नांदेड जिल्हा बँक निवडणुकीत राजूरकरांची ’चाणक्यनीती’ ठरली निर्णायक? संगीता डक पाटील यांच्या विजयाची शहरात राजकीय चर्चा
पायी लाँग मार्चची २६ जूनला चैत्यभूमीवर सांगता; उपवर्गीकरणाविरोधात आंबेडकरवादी युवकांचे एकजुटीचे आवाहन
Another paper leak protest, CJP offers support: Why are students on hunger  strike in Jharkhand?

झारखंड : झारखंडमधील विविध भरती परीक्षांमध्ये झालेल्या कथित गैरव्यवहाराविरोधात विद्यार्थ्यांचे सुरू असलेले आंदोलन अधिक तीव्र झाले आहे. १४ व्या झारखंड लोकसेवा आयोगाच्या (JPSC) पूर्व परीक्षेच्या पेपरफुटीची चौकशी आणि राज्य परीक्षा पद्धतीत व्यापक सुधारणांच्या मागणीसाठी विद्यार्थी नेते देवेंद्र नाथ महतो यांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे. दरम्यान, कॉकरोच जनता पार्टीने (CJP) या आंदोलनाला पाठिंबा दिल्याने रांचीतील या आंदोलनाला आणखी बळ मिळाले आहे.

स्पर्धा परीक्षांमधील कथित अनियमिततेविरुद्ध विद्यार्थी आंदोलन करत असलेल्या रांचीमधील जयपाल सिंग मुंडा स्टेडियमवर, विद्यार्थी नेते देवेंद्र नाथ महतो यांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे. मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्याकडे मांडलेल्या मागण्या मान्य होईपर्यंत हे उपोषण मागे घेणार नाही, असा इशारा महतो यांनी दिला आहे.

वृत्तसंस्था ‘एएनआय’शी बोलताना देवेंद्र नाथ महतो यांनी सांगितले की, ५ जुलै रोजी आम्ही आंदोलनाला सुरुवात केली. ७ जुलै रोजी राज्यपालांची भेट घेतली. ८ जुलै रोजी प्रतीकात्मक पुतळा दहन आंदोलन केले. २० जुलै रोजी मुख्यमंत्र्यांना भेटून पुरावे सादर केले, ज्यानंतर अधिकृत कारवाईला गती मिळाली. मात्र, महिनाभर उलटूनही राज्य सरकार आणि आयोग विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहत नाही. विद्यार्थ्यांचे मनोबल उंचावण्यासाठी आणि हा लढा तीव्र करण्यासाठी बेमुदत उपोषण सुरू केले आहे.

१९ एप्रिल रोजी घेण्यात आलेली १४ वी जेपीएससी नागरी सेवा पूर्व परीक्षा पेपरफुटीमुळे रद्द करण्यात यावी, या परीक्षांमधील गैरव्यवहाराची उच्चस्तरीय चौकशी व्हावी, ब्लॅकलिस्टेड टीडीपीएल एजन्सीद्वारे आयोजित सर्व परीक्षांची फेरतपासणी व्हावी आणि ओएमआर उत्तरपत्रिकेत अनुत्तरित प्रश्नांसाठी पाचवा पर्याय समाविष्ट केला जावा, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत.

या आंदोलनाला कॉकरोच जनता पार्टीकडून पाठिंबा मिळाला आहे. सीजेपीचे संस्थापक अभिजित दीपके यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत, सीजेपी विद्यार्थ्यांच्या पाठीशी ठामपणे उभी असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अमर कुमार बाउरी यांनी परीक्षांमधील कथित गैरव्यवहारावरून राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला असून मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी याची नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे.

COMMENTS