Homeताज्या बातम्या

पाकिस्तानात शांतता यात्रेदरम्यान बॉम्बस्फोट; १३ लोकांचा मृत्यू, २२ गंभीर जखमी

इस्लामाबाद : पाकिस्तानातील खैबर पख्तुनख्वा भागातील स्वात जिल्ह्यात आज शांतता यात्रेदरम्यान भीषण बॉम्बस्फोट झाला असून यामध्ये १३ लोकांचा मृत्यू झा

लोकशाहीर अण्णा भाऊ साठेंचे संगमनेरमध्ये अद्यावत स्मारक होणार: माजी आ. डॉ. सुधीर तांबे
त्रुटी आढळल्यास विधी महाविद्यालयांची मान्यता धोक्यात; बार कौन्सिल ऑफ इंडियाचा कडक इशारा
मुंबईसह घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा; पुढील चार दिवस अनेक भागांत सतर्कतेचा इशारा
Pakistan मध्ये शांतता रॅलीमध्येच फुटला बॉम्ब; १४ जण ठार -  www.marathi.hindusthanpost.com

इस्लामाबाद : पाकिस्तानातील खैबर पख्तुनख्वा भागातील स्वात जिल्ह्यात आज शांतता यात्रेदरम्यान भीषण बॉम्बस्फोट झाला असून यामध्ये १३ लोकांचा मृत्यू झाला आहे, तर २२ जण गंभीर जखमी झाले आहेत. हा बॉम्बस्फोट पाकिस्तानी पोलिसांना लक्ष्य करण्यासाठी करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. या घटनेचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

हा बॉम्बस्फोट एक आत्मघाती हल्ला असल्याचे बोलले जात असले तरी याबाबत अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही. ही रॅली स्थानिक ट्रायबल कौन्सिल ‘अमन जिरगा’ यांनी आयोजित केली होती. नागरिक शांततेच्या घोषणा देत आणि मागण्यांचे फलक हातात धरून रॅली काढत होते. या फलकांवर गेल्या काही महिन्यांत परिसरात ढासळलेल्या सुरक्षा व्यवस्थेबाबत चिंता व्यक्त करण्यात आली होती. स्फोटानंतर बचाव पथकाने जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केले असून पोलिसांनी संपूर्ण परिसराला वेढा घालून नाकेबंदी केली आहे.

COMMENTS