पुणे : हडपसर येथील अमनोरा गोल्ड टॉवरमध्ये कौटुंबिक वादातून ३३ वर्षीय आयटी अभियंत्याने पंधराव्या मजल्यावरील सदनिकेतून उडी मारून आत्महत्या केल्याची
पुणे : हडपसर येथील अमनोरा गोल्ड टॉवरमध्ये कौटुंबिक वादातून ३३ वर्षीय आयटी अभियंत्याने पंधराव्या मजल्यावरील सदनिकेतून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. राहुल वेदाभ्यास पटेल (वय ३३, मूळ रा. ओडिशा) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे.
राहुल हा अमनोरा गोल्ड टॉवरमधील पंधराव्या मजल्यावरील फ्लॅट क्रमांक १५०३ मध्ये भाड्याने राहत होता. ही सदनिका मृणाल सोनू कुमार यांच्या मालकीची आहे. राहुल मूळचा ओडिशा राज्यातील सुगडा परिसरातील रहिवासी असून पुण्यातील एका आयटी कंपनीत नोकरीला होता. गेल्या काही दिवसांपासून राहुल आणि त्याच्या पत्नीमध्ये सातत्याने वाद सुरू होते. दोघांमधील मतभेद इतक्या टोकाला गेले होते की, प्रकरण घटस्फोटापर्यंत पोहोचले होते. या कौटुंबिक वादातून आणि मानसिक ताणातून शनिवारी राहुलने पंधराव्या मजल्यावरून खाली उडी मारल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

COMMENTS