oplus_2097152 शेवगाव : कारगिल शहीद दिनानिमित्त माजी सैनिकांचा अपेक्षित सन्मान करण्यात आला नसल्याच्या निषेधार्थ शेवगाव तालुक्यातील माजी सैनिकांनी स

शेवगाव : कारगिल शहीद दिनानिमित्त माजी सैनिकांचा अपेक्षित सन्मान करण्यात आला नसल्याच्या निषेधार्थ शेवगाव तालुक्यातील माजी सैनिकांनी सोमवारी (दि. ३) तहसील कार्यालयावर मूक मोर्चा काढून प्रशासन व लोकप्रतिनिधींच्या भूमिकेचा निषेध व्यक्त केला.
माजी सैनिकांच्या म्हणण्यानुसार, २६ जुलै हा दिवस देशभरात कारगिल शहीद दिन म्हणून साजरा केला जातो. मात्र, शेवगाव येथे माजी सैनिकांचा अपेक्षित सन्मान करण्यात आला नसल्याने तालुक्यातील विविध माजी सैनिक संघटनांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली. या पार्श्वभूमीवर शेकडो माजी सैनिकांनी शांततेच्या मार्गाने मूक मोर्चा काढत तहसील कार्यालय गाठले.
यावेळी तहसीलदार आकाश दहाडदे यांना निवेदन सादर करण्यात आले. भविष्यात अशा प्रकारची घटना पुन्हा घडू नये तसेच कारगिल शहीद दिनासह विविध राष्ट्रीय कार्यक्रमांमध्ये माजी सैनिकांचा सन्मानपूर्वक गौरव करण्यात यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
निवेदन स्वीकारताना तहसीलदार आकाश दहाडदे यांनी प्रशासनाच्या वतीने झालेल्या त्रुटीबद्दल दिलगिरी व्यक्त केली. भविष्यात अशी चूक होणार नाही आणि माजी सैनिकांचा योग्य तो सन्मान राखला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
या मोर्चात माजी सैनिक संघटनेचे उपाध्यक्ष शिवाजी बडे, सचिव सुरेश आव्हाड, भक्तराज केदार, रुस्तुम रुईकर, चंद्रकांत घनवट, ए. बी. वांढेकर, अनिल म्हस्के, अर्जुन पठाडे, विष्णू आधाट, मोहन तेलोरे, रुस्तुम बटुळे, विष्णू जायभाये, महादेव खेडकर, संतोष घुले, बाळासाहेब खराडे, सर्जेराव घानमोडे यांच्यासह तालुक्यातील शेकडो माजी सैनिक सहभागी झाले होते.

COMMENTS