देवळाली प्रवरा : राहुरी तालुका तसेच श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातील देवळाली प्रवरा परिसरासह ३२ गावांतील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या पदाधिक

देवळाली प्रवरा : राहुरी तालुका तसेच श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातील देवळाली प्रवरा परिसरासह ३२ गावांतील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकारी व शिवसैनिकांची महत्त्वपूर्ण बैठक देवळाली प्रवरा येथे उत्साहात पार पडली. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटन अधिक बळकट करणे, मतदार यादी पुनर्विलोकनात सक्रिय सहभाग आणि बूथस्तरावरील नियोजन यावर बैठकीत विशेष भर देण्यात आला.
बैठकीत “गाव तेथे शाखा, घर तेथे शिवसैनिक” ही संकल्पना प्रभावीपणे राबविण्याचा निर्धार करण्यात आला. प्रत्येक गावात पक्षाची शाखा सक्षम करणे, नव्या कार्यकर्त्यांना पक्षाशी जोडणे आणि घराघरात पक्षाची भूमिका पोहोचविण्यासाठी व्यापक जनसंपर्क मोहीम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला.
यावेळी एसायर प्रक्रियेअंतर्गत बीएलए नियुक्ती, मतदार यादी पुनर्विलोकन कार्यक्रमात सक्रिय सहभाग, मतदार नोंदणीतील त्रुटी दूर करण्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे, अशा सूचना देण्यात आल्या. तसेच आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका लक्षात घेऊन गट व गणनिहाय पक्षबांधणी, बूथनिहाय नियोजन आणि संघटन विस्ताराबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
बैठकीत सध्याच्या राज्य सरकारच्या कामकाजातील अपयश, जनतेसमोरील विविध प्रश्न आणि शासनाच्या धोरणांबाबत नागरिकांपर्यंत पक्षाची भूमिका प्रभावीपणे पोहोचविण्याचे आवाहन करण्यात आले.
बैठकीचा आढावा जिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी यांनी घेतला. यावेळी श्रीरामपूर तालुकाप्रमुख दत्ता कडूपाटील, उपजिल्हाप्रमुख सचिन लाटे, भगीरथ पवार, तालुकाप्रमुख विजय गव्हाणे, शहरप्रमुख विजय कुमावत, तसेच विठ्ठल कोळसे, पोपटराव पवार, सचिन मोरे यांच्यासह राहुरी तालुक्यातील मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.
बैठकीत आगामी निवडणुकांसाठी संघटन मजबूत करून पक्षाची ताकद वाढविण्याचा निर्धार सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.

COMMENTS