कुंडलवाडी : राष्ट्रीय आर्थिक दुर्बल व वंचित घटकांसाठी घेण्यात येणार्या एनएमएमएस शिष्यवृत्ती परीक्षेत मिलिंद विद्यालयाने बिलोली तालुक्यात प्रथम क

कुंडलवाडी : राष्ट्रीय आर्थिक दुर्बल व वंचित घटकांसाठी घेण्यात येणार्या एनएमएमएस शिष्यवृत्ती परीक्षेत मिलिंद विद्यालयाने बिलोली तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. यंदाही विद्यालयाने आपली उज्ज्वल परंपरा कायम राखत उत्कृष्ट निकाल नोंदवला आहे.
नुकत्याच जाहीर झालेल्या निकालानुसार विद्यालयातील सहा विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक ठरले असून, त्यांच्या या यशाचे शहरासह परिसरात कौतुक होत आहे. प्रवीण जजगेकर, अंजली राचोटी, नक्षत्र मामडे, ऋतुजा गंगुलवार, महेश कोटलावार आणि अवनी अर्जुने या विद्यार्थ्यांनी ही कामगिरी बजावली आहे. विद्यार्थ्यांचा सातत्यपूर्ण अभ्यास, कठोर परिश्रम आणि शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन यामुळेच हे यश शक्य झाल्याचे विद्यालयाने नमूद केले आहे. या यशाबद्दल शाळेचे अध्यक्ष कुणाल संभाजी लोहगावकर, संचालक वीर लोहगावकर, मुख्याध्यापक एच. एन. पांचाळ, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र नरवाड तसेच बालाजी गंगोने, शिवराज हाळीखेडे, विजयकुमार देगावकर, कुलदीप खेळगे आदींनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यासोबतच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांच्या योगदानाचेही विशेष कौतुक करण्यात आले.

COMMENTS