Homeताज्या बातम्याअहमदनगर

टाकळी-शेडगाव मार्गावरून नागरिकांचा संतापवर्षानुवर्षे रस्त्याची दुरवस्था ‘जैसे थे’; प्रशासन आणि लोकप्रतिनिधींवर टीका

श्रीगोंदा: “३० वर्षांपूर्वी १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीच्या भाषणात ज्या खड्ड्यांचा उल्लेख व्हायचा, ते आजही तितक्याच दिमाखात तिथेच आहेत” अशा उपरोधिक शब्दांत सुरू झालेली शेडगावकरांची सोशल मीडियावरील पोस्ट सध्या तालुकाभर चर्चेचा विषय ठरत आहे. रस्त्यांच्या दुरवस्थेवर भाष्य करणारी ही पोस्ट व्हॉट्सॲप, फेसबुक, इंस्टाग्रामसह विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून नागरिकांचा वाढता संताप त्यातून स्पष्टपणे दिसून येत आहे.श्रीगोंदा तालुक्यातील टाकळी ते शेडगाव मार्गाची अवस्था अत्यंत बिकट झाली असून ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. विशेष म्हणजे अवघ्या वर्षभरापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत कोट्यवधी रुपये खर्च करून या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले होते. मात्र कामाचा निकृष्ट दर्जा, दर्जाहीन साहित्याचा वापर आणि ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे रस्ता अल्पावधीतच उखडल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या पोस्टमध्ये नागरिकांनी उपरोधिक शैलीत प्रशासन आणि लोकप्रतिनिधींवर निशाणा साधला आहे. या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी ग्रामपंचायत आणि नागरिकांनी वेळोवेळी निवेदने दिली, आंदोलने केली; मात्र अद्याप ठोस कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. “प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष प्रत्येक गोष्टीवर जनता कर भरते, मग आमच्या हक्काच्या सुविधा जातात कुठे?” असा सवालही नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.दरम्यान, “रस्त्यावर खड्डा की खड्ड्यात रस्ता?” अशी परिस्थिती निर्माण झाल्याने वाहनचालकांमध्ये तीव्र नाराजी आहे. अनेकांनी सोशल मीडियाचा आधार घेत प्रशासन आणि सरकारपर्यंत आपली व्यथा पोहोचवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.टाकळी-शेडगाव रस्त्याच्या दुरुस्तीबाबत प्रशासन नेमकी कोणती पावले उचलणार आणि नागरिकांना सुरक्षित, मजबूत रस्ता कधी मिळणार, याकडे आता संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.बापू, काका, साहेब आले आणि गेले; रस्ता आहे तसाच !“काँग्रेस, भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी… किती दादा, बापू, काका, साहेब आले आणि गेले; पण हा रस्ता कोणासमोर झुकला नाही,” असा टोला लगावत “हा खराब रस्ता नसून ३० वर्षांचा ऐतिहासिक वारसा आहे,” असेही पोस्टमध्ये म्हटले आहे. या उपरोधिक भाषेमुळे पोस्ट अधिकच चर्चेत आली आहे.पावसाळ्यात परिस्थिती गंभीरग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, नवीन डांबर टाकल्यानंतर काही महिन्यांतच रस्ता पुन्हा पूर्ववत होतो. खड्ड्यांमुळे दुचाकीस्वारांचे संतुलन बिघडून अपघातांचे प्रमाण वाढले आहे. पावसाळ्यात परिस्थिती आणखी गंभीर बनते. रस्त्यावर साचणारे पाणी, उडणारी धूळ आणि वाहतुकीतील अडथळे यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.

‘मंथन’ परीक्षेत ‘डीबीएम’चे 86 विद्यार्थी गुणवत्ता यादीत
वीजबिल शून्यावर आणणारा विद्यार्थ्यांचा सोलर प्रोजेक्ट !सोनिया गांधी पॉलीटेक्निकच्या विद्यार्थ्यांची उल्लेखनीय कामगिरी
बालमटाकळीत 950 मीटर लांबीच्या बंधाऱ्याची कामे पूर्ण

COMMENTS