Homeताज्या बातम्याअहमदनगर

चांभुर्डी गावाने जतन केला मराठेशाहीचा जिवंत इतिहासबुरुज, देवडी आणि दगडी पायऱ्यांसह ऐतिहासिक ‘वेस’ आजही सुस्थितीत

श्रीगोंदा : इतिहास हा केवळ पुस्तकांच्या पानांमध्ये बंदिस्त नसतो, तर तो गावाच्या मातीत, जुन्या दगडी वास्तूंमध्ये आणि लोकांच्या जपलेल्या परंपरेत जिवंत असतो. याच इतिहासाचा प्रत्यय अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील चांभुर्डी या छोट्याशा गावात येतो. श्रीगोंदापासून सुमारे ३८ ते ४० किलोमीटर अंतरावर असलेल्या या गावाने मराठेशाहीकालीन ऐतिहासिक वारसा आजही अत्यंत अभिमानाने जपून ठेवला आहे.आज महाराष्ट्रातील अनेक गावांमधील जुन्या वेशी, तटबंदी आणि बुरुज काळाच्या ओघात नामशेष झाले आहेत. मात्र चांभुर्डी गावातील ऐतिहासिक वेस अजूनही भक्कमपणे उभी असून मराठेशाही स्थापत्यकलेचा जिवंत नमुना ठरत आहे. गावाच्या प्रवेशद्वारावर उभारलेली ही वेस मध्ययुगीन स्थापत्यशास्त्राची साक्ष देणारी वास्तू आहे. दगडी बांधकाम, मजबूत पाया आणि भव्य रचना पाहताना तत्कालीन कारागिरांच्या कौशल्याची कल्पना येते.या वेशीच्या दोन्ही बाजूंना दोन विशाल आणि मजबूत बुरुज बांधलेले आहेत. विशेष म्हणजे बुरुजावर आणि वेशीवर चढण्यासाठी तयार करण्यात आलेल्या दगडी पायऱ्या आजही उत्तम स्थितीत आहेत. अनेक वर्षांचा इतिहास पेलून उभ्या असलेल्या या पायऱ्यांचा वापर काही ग्रामस्थ आजही करताना दिसतात. पूर्वी या वेशीला सागवान लाकडाचा मोठा आणि मजबूत दरवाजा होता. काळाच्या ओघात तो खराब झाला असला तरी त्याचे अवशेष अजूनही जुन्या वैभवाची आठवण करून देतात.वेशीच्या आतील बाजूस, वेशीतून बाहेर पडताना डाव्या हाताला एक लहानशी खोलीसारखी जागा दिसून येते. या जागेला “देवडी” म्हटले जाते. एका व्यक्तीला बसता येईल एवढ्या आकाराची ही देवडी आजही सुरक्षित आहे. पूर्वी गावाच्या सुरक्षेची जबाबदारी सांभाळणारे वेसकरी येथे पहारा देत असत. रात्रीच्या वेळी वेशीचा दरवाजा बंद करणे, गावात येणाऱ्या-जाणाऱ्या अनोळखी व्यक्तींवर लक्ष ठेवणे आणि गावाची सुरक्षा सांभाळणे ही कामे याच देवडीतून केली जात होती. त्यामुळे ही देवडी महाराष्ट्रातील जुन्या बारा बलुतेदार व्यवस्थेची आणि ग्रामीण सुरक्षाव्यवस्थेची जिवंत साक्ष मानली जाते.या वेशीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तिच्या भिंतीवर कोरलेल्या मूर्ती. ग्रामस्थांच्या माहितीनुसार, वेशीवर प्रभू श्रीरामांची कोरीव मूर्ती असून दुसऱ्या बाजूस हनुमानाची प्रतिमा आहे. या मूर्ती केवळ धार्मिक श्रद्धेचे प्रतीक नसून तत्कालीन कलाकुसरीचेही दर्शन घडवतात.इतिहासप्रेमी, पर्यटक आणि पुरातत्व अभ्यासकांनी चांभुर्डी गावाला भेट देऊन या ऐतिहासिक वारशाचा अभ्यास करावा, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. मराठेशाहीच्या वैभवशाली इतिहासाची साक्ष देणारी ही वेस आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी ठरत आहे.अधिकृत दस्तऐवजीकरण होणे आवश्यकइतिहास अभ्यासकांच्या मते, पाया, बुरुज, दगडी पायऱ्या आणि देवडी एवढ्या चांगल्या स्थितीत असलेली वेस संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यात दुर्मीळ आहे. ग्रामस्थांनी वर्षानुवर्षे हा ऐतिहासिक वारसा जतन केला असला तरी आता या वास्तूचे अधिकृत दस्तऐवजीकरण आणि संवर्धन होणे आवश्यक असल्याची भावना व्यक्त होत आहे.

जामखेडमधील अतिक्रमण, महामार्ग प्रश्नावर प्रशासन अलर्टसभापती राम शिंदे यांनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांसह बैठक
तोहिद खान हत्याप्रकरणी मुद्दा उपस्थित केल्याबद्दल आ. धनंजय मुंडे यांचे समर्थनआ. प्रकाश सोळंके यांच्या वक्तव्याचा मौलाना आझाद सामाजिक फाउंडेशनकडून निषेध
जामखेडमधील भेसळखोरांवर कारवाई करावीजन जागरण युवा मंचची आयुक्त मुंढे यांच्याकडे मागणी

COMMENTS