Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

NEET परीक्षेच्या धक्क्यातून विद्यार्थिनीची आत्महत्या; लातूरमधील दुर्दैवी घटना

लातूर : वैद्यकीय शिक्षणासाठी घेतल्या जाणाऱ्या राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षेत (NEET) प्रश्नपत्रिका गळती प्रकरणाने निर्माण झालेल्या अनिश्चिततेचा

पुण्यात उद्या ‘कॉकरोच जनता पक्षाचे आंदोलनकेंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची प्रमुख मागणी
नीट पेपर लीकप्रकरणी बिहार बंद दरम्यान हिंसाचार; सीवानमध्ये दगडफेकीत एसपी जखमी, तेजप्रताप यादव पोलिसांच्या ताब्यात
नीट पेपरफुटी प्रकरणाने लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य अधांतरी; विद्यार्थ्यांच्या मानसिकतेचा विचार कोण करणार?
Latur Student Suicide After NEET Paper Leak; Mathili Sonawane

लातूर : वैद्यकीय शिक्षणासाठी घेतल्या जाणाऱ्या राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षेत (NEET) प्रश्नपत्रिका गळती प्रकरणाने निर्माण झालेल्या अनिश्चिततेचा गंभीर परिणाम विद्यार्थ्यांच्या मानसिक स्थितीवर होत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. लातूर जिल्ह्यातील गोंदेगाव येथे राहणाऱ्या १८ वर्षीय मैथिली अशोक सोनावणे या विद्यार्थिनीने राहत्या घरी गळफास घेऊन आपले जीवन संपवल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. डॉक्टर होण्याचे मोठे स्वप्न बाळगलेल्या मैथिलीच्या मृत्यूमुळे परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मैथिली अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेत होती. वैद्यकीय क्षेत्रात प्रवेश मिळवण्यासाठी तिने दीर्घकाळ मेहनत घेतली होती. ३ मे रोजी झालेली प्रवेश परीक्षा तिने आत्मविश्वासाने दिली होती. चांगले गुण मिळून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळेल, अशी तिची अपेक्षा होती. मात्र, प्रश्नपत्रिका गळतीच्या आरोपांनंतर परीक्षा प्रक्रियेवर निर्माण झालेला वाद, त्यानंतरचा गोंधळ आणि परीक्षा रद्द होण्याच्या चर्चेमुळे ती प्रचंड मानसिक तणावाखाली गेली होती.

कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, गेल्या काही दिवसांपासून मैथिली चिंताग्रस्त होती आणि भविष्या संदर्भात सतत अस्वस्थ दिसत होती. अखेर तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याने सोनावणे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

COMMENTS