पाथर्डी : महाराष्ट्र शासनाने नुकताच महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त अधिनियमामध्ये केलेल्या दुरुस्ती प्रमाणे व राज्यपाल यांनी दिलेल्या संमतीनुसार व

पाथर्डी : महाराष्ट्र शासनाने नुकताच महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त अधिनियमामध्ये केलेल्या दुरुस्ती प्रमाणे व राज्यपाल यांनी दिलेल्या संमतीनुसार व अधिनियमातील तरतूदीनूसार, श्री मोहटादेवीचे पूजन करून श्रीक्षेत्र मोहटादेवी देवस्थानचा पदभार अहिल्यानगरचे धर्मादाय उप आयुक्त नवनाथ जगताप यांनी नूकताच स्विकारला.
याबाबत महाराष्ट्राचे विधी व न्याय विभागाने नुकतीच अधिसुचना प्रकाशित करून महाराष्ट्रातील महत्वाचे देवस्थानचे नियमन दिवाणी अथवा जिल्हा न्यायालयाकडे होते, ते रद्द करण्याचे राजपत्र प्रकाशित करून आता धर्मादाय आयुक्त यांची नियुक्ती केलेली आहे.
यावेळी देवस्थानचा पद्भार स्विकारताना धर्मादाय उप आयुक्त नवनाथ जगताप यांनी भावीक भक्तांना जास्तीत जास्त सुविधा उपलब्ध करून देवून विश्वासाने देवस्थानचे कार्य यापुढेही सुरु ठेवू व देवस्थानचा नावलौकीक देशभरात वाढवू , श्रीक्षेत्र नाशिक येथे होत असलेला आगामी कुंभमेळा पर्णवीमध्ये मोहटादेवी गडावर येणाऱ्या भाविकाकरिता विशेष सुविधा देवस्थान मार्फत उपलब्ध करून दिल्या जातील , तसेच महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार व धर्मादाय आयुक्त अमोघ कलोती यांचे मार्गदर्शनाखाली चांगला व पारदर्शक कारभार करु, मंदिर परिसर विकास कामावर भर देवू असे प्रतिपादन केले. यावेळी त्यांनी मंदिर परिसर व दानपेटी मोजदाद कार्यक्रमाची पाहणी केली.
याप्रसंगी देवस्थानचे विश्वस्त ऍड. विक्रम वाडेकर, बाबासाहेब दहिफळे, शुभम दहिफळे, बाळासाहेब लाहोटी, शशिकांत दहिफळे, राजेंद्र शिंदे, मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश भणगे, जनसंपर्क अधिकारी भिमराव खाडे, लेखापाल संदीप घुले तसेच ममता सुरदुशे (अधीक्षक) विनोद पाटील (निरीक्षक), जिजाबा कुंजीर, श्री कानिफनाथ देवस्थान मढीचे विश्वस्त महादेव कोकाटे, व देवस्थानचे कर्मचारी उपस्थित होते.

COMMENTS