Homeताज्या बातम्या

श्रीलंका दौऱ्यापूर्वी भारतीय संघाच्या सराव सामन्याच्या वेळापत्रकात बदल; चार दिवसांऐवजी तीन दिवसांचा रंगणार सामना

नवी दिल्ली : शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट संघ लवकरच श्रीलंका दौऱ्यासाठी रवाना होणार आहे. या दौऱ्यातील पहिला कसोटी सामना १५ ऑगस्टपास

मेळघातात अंधश्रद्धेचा अघोरी प्रकार; अवघ्या १५ दिवसांच्या नवजात बालिकेच्या पोटावर दिले चटके!
न्यायपालिकेने केली जंतरमंतर लाठिमार चौकशीची मागणी !
सोलापूरमधील ‘सद्गुरू बसवारूढ महास्वामींचा मठ’ उडवून देण्याची धमकी; संशयित महिला पोलिसांच्या ताब्यात
श्रीलंका दौऱ्यावर जाणार भारतीय क्रिकेट टीम, 2 मॅच Test Series मध्ये भिडणार;  कधी आणि कुठे होणार सामने | Navarashtra

नवी दिल्ली : शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट संघ लवकरच श्रीलंका दौऱ्यासाठी रवाना होणार आहे. या दौऱ्यातील पहिला कसोटी सामना १५ ऑगस्टपासून सुरू होणार असून, त्यापूर्वी होणाऱ्या सराव सामन्याच्या वेळापत्रकात महत्त्वपूर्ण बदल करण्यात आला आहे. सुरुवातीला चार दिवसांचा नियोजित असलेला हा सराव सामना आता तीन दिवसांचा खेळवला जाणार आहे.

भारतीय संघ आणि श्रीलंका एकादश यांच्यातील सराव सामना आता ७ ते ९ ऑगस्टदरम्यान कोलंबो येथे होईल. दौऱ्याच्या कार्यक्रमानुसार भारतीय संघ ४ ऑगस्ट रोजी श्रीलंकेसाठी रवाना होईल. त्यानंतर खेळाडू सराव शिबिर आणि तीन दिवशीय सराव सामन्यात सहभागी होतील. या सामन्यांनंतर संघ गॅले येथे जाईल, जिथे १५ ऑगस्टपासून पहिल्या कसोटी सामन्याला प्रारंभ होणार आहे. श्रीलंका दौरा भारतासाठी जागतिक कसोटी अजिंक्यपद (WTC) स्पर्धेच्या गुणतालिकेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. अंतिम फेरीत पोहोचण्याच्या आशा कायम ठेवण्यासाठी भारताला श्रीलंकेविरुद्धचे दोन्ही कसोटी सामने जिंकणे आवश्यक मानले जात आहे.

COMMENTS