Homeताज्या बातम्या

सोलापूरमधील ‘सद्गुरू बसवारूढ महास्वामींचा मठ’ उडवून देण्याची धमकी; संशयित महिला पोलिसांच्या ताब्यात

सोलापूर: सोलापूर शहरातील कस्तुरबा नगर (नवी जिंदगी भाग) येथील प्रसिद्ध श्री श्री सद्गुरू बसवारूढ महास्वामींच्या मठाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी

जनार्दन स्वामींच्या समाधीस्थानी गुरुपौर्णिमा उत्सवाचे आयोजन; बेट-कोपरगाव येथे धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल
विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज कशासाठी?
एचपीव्ही लसीकरणाबाबत आरोग्य विभागाची जनजागृती मोहीम; ‘एचपीव्ही लस मी घेतली, आपणही घ्या..!’ विद्यार्थिनींचे आवाहन
Solapur Math: 'मंदिर हम उडा देंगे', मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या गुरूंचा मठ  उडवून देण्याची धमकी, संशयित महिला सीसीटीव्ही कॅमेरात कैद - Marathi News ...

सोलापूर: सोलापूर शहरातील कस्तुरबा नगर (नवी जिंदगी भाग) येथील प्रसिद्ध श्री श्री सद्गुरू बसवारूढ महास्वामींच्या मठाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारी चिठ्ठी सापडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांचे गुरू म्हणून ख्याती असलेल्या या ५२ वर्षे जुन्या मठात, एका महिलेने ही धमकीची चिठ्ठी टाकल्याचे सीसीटीव्ही फुटेजवरून समोर आले आहे.

याप्रकरणी सोलापूर पोलिसांनी तातडीने कारवाई करत मेहरून्निसा लाडलेसाब शेख नामक संशयित महिलेला अटक केली आहे. कोर्टात हजर केले असता, आरोपी महिलेला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून ही चिठ्ठी टाकण्यामागील खरा हेतू काय होता, याचा शोध घेत आहेत.

COMMENTS